Bangladesh Plane Crash : बांगलादेशमधील विमान अपघातामध्ये 16 मुलांसह 19 ठार, वाचा सर्व अपडेट

Bangladesh Plane Crash: बांगलादेशी राजधानी ढाकामध्ये सोमवारी दुपारी बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bangladesh Plane Crash : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये विमान कोसळले आहे.
मुंबई:

Bangladesh Plane Crash: 

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेल्या अपघात अद्याप ताजा आहे. त्यापाठोपाठ बांगलादेशची राजधानी ढाका देखील एका विमान अपघातानं हादरली आहे.  

बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान (ट्रेनिंग एअरक्राफ्ट) सोमवार, 21 जुलै रोजी दुपारी अंदाजे 1.30 वाजता कोसळले. हे F7 प्रकारचे विमान होते आणि ते ढाका येथील उत्तरेकडील उत्तरा परिसरातील एका कॉलेज कॅम्पसमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात 16 मुलांसह एकूण 19 जणांचा मृत्यू झाला असून, अन्य काही जण जखमी झाले आहेत. बांगलादेशचे प्रमुख बंगाली वृत्तपत्र 'प्रोथोम आलो'च्या वृत्तानुसार, चार जखमींना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने संयुक्त लष्करी रुग्णालयात (CMH) नेण्यात आले आहे.

अपघात कसा घडला?
हे विमान दुपारी ढाकाच्या उत्तरा भागातील 'माईलस्टोन स्कूल अँड कॉलेज'च्या कॅम्पसमध्ये कोसळले, जिथे मुले उपस्थित होती. दूरचित्रवाणीवरील फुटेजमध्ये अपघातस्थळावरून आग आणि धूर निघताना दिसत आहे. माईलस्टोन कॉलेजच्या एका शिक्षकाने 'द डेली स्टार' वृत्तपत्राला सांगितले की, ते कॉलेजच्या इमारतीजवळ उभे असताना विमान तीन मजली शाळेच्या इमारतीला समोरून धडकले, ज्यामुळे अनेक विद्यार्थी आत अडकले.

वृत्तपत्रानुसार, शिक्षकांनी सांगितले, "कॉलेजचे शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धावले. थोड्याच वेळात लष्कराचे जवान पोहोचले, त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यात सामील झाले."

बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयाने (पब्लिक रिलेशन्स ऑफिस) एका संक्षिप्त निवेदनात याबाबत दुजोरा दिला आहे. बांगलादेशच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे, "आज दुपारी 1:06 वाजता F-7 BGI प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले आणि त्यानंतर लगेचच ते कॉलेज कॅम्पसमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले."

Advertisement

दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर विमानात आग लागली. उसळणारा धूर खूप दूरवरून दिसत होता. आग विझवण्यासाठी अग्निशमन सेवेची ८ युनिट्स घटनास्थळी पोहोचली. bdnews24 ने फायर सर्व्हिस सेंट्रल कंट्रोल रूमच्या ड्युटी ऑफिसर लीमा खानम यांच्या हवाल्याने सांगितले, "ट्रेनिंग एअरक्राफ्ट डायबारीतील माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. आमच्या टीमने एक मृतदेह ताब्यात घेतला आहे. हवाई दलाने चार जखमींना वाचवले आणि त्यांना सोबत घेऊन गेली." मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. वैमानिकांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Topics mentioned in this article