एक काळ असा होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डची मोठी दहशत होती. ही दहशत मोडून काढण्यासाठी मुंबई पोलिसांच्या धाडसी अधिकाऱ्यांची एक फळी तयार करण्यात आली. या पोलिसांनी अनेक गुंडांना यमसदनी पाठवत, मुंबईला भयमुक्त करण्याचे काम केले. एन्काऊन्टर स्पेशालिस्ट असं या धाडसी अधिकाऱ्यांना म्हटले जाऊ लागले, ज्यामध्ये प्रदीप शर्मा, दया नायक, विजय साळसकर यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनीही मुंबई पोलिसांच्या पावलावर पाऊल टाकत गेल्या काही वर्षांत गुंडांचा खात्मा करण्यासाठी एन्काऊन्टर सुरू केली आहेत. यामुळे भारतातील नागरिकांना एन्काऊन्टर होणे ही काही नवी बाब राहिलेली नाही. मात्र पोलिसांनी एकाचवेळी 64 गुंडांचा एन्काऊन्टरमध्ये खात्मा करणे ही बहुधा इतिहासातील पहिलीच घटना असावी. या कारवाईत काही पोलिसांचाही जीव गेला आहे. ही घटना भारतात घडली नसून ती ब्राझीलमध्ये घडली आहे.
नक्की वाचा: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल
4 पोलिसांचा मृत्यू
ब्राझीलच्या रिओ दी जेनेरोमध्ये संघटीत गुन्हेगारांविरोधात एका धडक कारवाईचं पोलिसांनी नियोजन केलं होतं. पोलिसांनी या कारवाईत 64 गुंड यमसदनी पाठवल्याचे वृत्त आहे. दुर्दैवाची बाब ही आहे की या कारवाईत 4 पोलिसांचाही मृत्यू झालाय. एलेमाओ आणि पनहा कॉम्प्लेक्स फेवेला भागात या चकमकी उडाल्या होत्या. या दोन्ही भागांवर कमांडो वर्मेल्हो नावाच्या टोळीचं वर्चस्व होतं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
नक्की वाचा: अरे देवा! रस्त्याच्या कडेला भेटले चमत्कारी 'निळे अंडे', 50 दिवसांनी फुटले अन् बाहेर आलं...
गुंडांचा ड्रोनद्वारे पोलिसांवर हल्ला
या कारवाईबद्दलची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की पोलिसांना या कारवाईत कमीतकमी 42 रायफल्स सापडल्या आहेत. या गुंडांविरोधात आणि त्यांच्या टोळीविरोधातील कारवाईची आखणी गेले वर्षभर सुरू होती. या कारवाईत अंदाज 2,500 च्या आसपास सैनिक आणि पोलिसांनी भाग घेतला होता. कमांडो वर्मेल्हो ही ब्राझीलमधील सर्वात जुनी आणि सक्रिय टोळी आहे. 1985 साली ब्राझीलमधील लष्करी हुकूमशाहीच्याविरोधात उतरलेल्या तरुणांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्या तुरुंगात या तरुणांचा रेड कमांड नावाचा एक गट तयार झाला होता, जो पुढे जाऊन गुन्हेगारी टोळीत रुपांतरीत झाला. जगभरात या टोळीने आपले जाळे पसरवले होते. अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणी हा या टोळीचा मुख्य धंदा बनला होता. या गँगमधील गुंडांनी सैनिक आणि पोलिसांना अडवण्यासाठी असंख्य गाड्या पेटवून दिल्या होत्या. या गँगवाल्यांनी पोलिसांवर हल्ले करण्यासाठी ड्रोनचाही वापर केला अशी माहिती मिळाली आहे.