VIDEO: युद्ध पेटलं! इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला; मिसाईलचा मारा, नागरिकांचा प्रचंड आक्रोश

तेहरानसह अनेक इराणी शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशभरात तात्काळ राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Israel attacks On iran:  इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून इस्रायलने इराणमध्ये मोठा हल्ला केला आहे. तेहरानसह अनेक इराणी शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशभरात तात्काळ राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. इस्रायलने इराणवर आगाऊ हल्ला करण्याची पुष्टी केल्यावर ही घोषणा करण्यात आली.  IDFने लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. 

इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इस्रायल आणि इराणमध्ये थेट युद्धाला सुरुवात झाली आहे.  इस्रायलने इराणमध्ये मोठा हल्ला केला आहे. तेहरानसह अनेक इराणी शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशभरात तात्काळ राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. इस्रायलने इराणवर आगाऊ हल्ला करण्याची पुष्टी केल्यावर ही घोषणा करण्यात आली.

इस्रायली हवाई दलाने इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला केला.तेहरानमध्ये अनेक स्फोट ऐकू आले. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोट ऐकू आले, ज्याची पुष्टी इराणी टीव्ही चॅनेलशी संबंधित सूत्रांनी देखील केली आहे. या वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की इस्रायलने अनेक लष्करी तळ आणि काही संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केले.

Ajit Pawar: अजित दादा गेले! महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या घटनेला 1 महिना पूर्ण; 30 दिवसात काय- काय घडलं?

लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

इराणवरील हल्ल्याच्या अनुषंगाने, इस्रायलने आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक भागात सायरन वाजवले. आयडीएफ फ्रंट कमांडने नागरिकांना त्यांचे जवळचे संरक्षित आश्रयस्थान ओळखण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि क्षेपणास्त्रांचा मारा होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले. या हल्ल्यानंतर इस्रायलवरही प्रत्युत्तर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इस्रायलने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. इस्रायलने विशेष आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्रायलमधील शाळांना सुट्टी घोषीत करण्यात आली आहे.

Advertisement