जगप्रसिद्ध कंपनीचा CEO अचानक बेपत्ता, हाती आलं 92 कोटींचं बिल! प्रकरण काय?

Bao Fan : चीनमधील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बाओ फेन यांच्या अचानक गायब होण्याच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

चीनमधील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बाओ फेन यांच्या अचानक गायब होण्याच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. बाओ फेन यांची कंपनी चायना रेनेसोला चीनी अधिकाऱ्यांनी 7.8 कोटी युआन (जवळपास 92 कोटींचं) बिल दिलं आहे. हे बिल कशाचं आहे, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. चायना रेनसो टेक सेक्टरमध्ये मोठे-मोठे सौदे करण्यासाठी ओळखली जाते. बाओ बेन यांनी 2005 साली या कंपनीची स्थापना केली होती. कमी कालावधीमध्ये ही कंपनी चीनमधील टेक कंपन्यांमधील सर्वात मोठी डील मेकर कंपनी बनली होती, 2015 साली बाओ फेन यांनी चीनच्या दोन प्रमुख फुड डिलिव्हरी कंपनी मीटुआन आणि डियानपिंग यांच्या विलिनीकरणात मोठी भूमिका बजावली होती.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बाओ फेन फेब्रुवारी 2023 पासून गायब आहेत. भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरु असतानच ते गायब झाले आहेत. या घटनेला दीड वर्ष उलटल्यानंतरही बाओ यांच्या विरोधात अद्याप कोणतेही अधिकृत आरोपत्र दाखल करण्यात आलेले नाही. 

चायना रेनसोनं फेब्रुवारीमध्ये हाँगकाँग शेअर मार्केटमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानुसार बाओ आरोग्याच्या कारणामुळे स्वत:च्य़ा कुटुंबासोबत अधिक वेळ घालवत आहेत. त्यासाठी त्यांनी संचालक आणि CEO पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आलेल्या स्टॉक फायलिंगनुसार कंपनीनं 1.1 कोटी डॉलर बिलबाबत खुलासा केला आहे. याबाबत समुहानं या प्रकरणात सुरु असलेल्या तपासाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिलाय. 'नवभारत टाईम्स' नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

( नक्की वाचा : भारताविरोध ते सख्ख्या भावाशी लग्नाचा आरोप... राहुल गांधी अमेरिकेत भेटले त्या Ilhan Omar कोण आहेत? )

फायनान्शियल टाईम्सने अज्ञात सोर्सचा हवाला देत बुधवारी वृत्त दिले होते की, 'कंपनीकडे या प्रकरणाबद्दल आणि देयकाच्या मागणीबद्दल इतकी कमी माहिती होती की त्याचे डॉक्युमेंटेशन करण्यास  कसे  लेखा परीक्षकांना त्रास होत आहे.  2023 मधील शेवटच्या तिमाहीत ही पैशांची मागणी करण्यात आली होती. ती नंतर पूर्ण करण्यात आली.  

Topics mentioned in this article