Hospital News : हॉस्पिटलमध्ये रुग्णांना औषधांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी दिल्या जातात. त्यामधून रुग्णांना आजाराचा विसर पडावा हा हेतू असतो. पण, एका हॉस्पिटलमधील अशीच थेरपी सध्या वादात सापडली आहे. कारण, येथील हॉस्पिटलमध्ये वृद्ध व्यक्तींच्या समोर कर्मचारी अश्लील डान्स करत होत्या. त्यामुळे खळबळ उडाली. उत्तर चीनमधील एका नर्सिंग होमने एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठा सार्वजनिक वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये एक महिला कर्मचारी वृद्ध रुग्णाच्या समोर कथितरित्या उत्तेजक डान्स करताना दिसत आहे. वृद्धांना त्यांची औषधे घेण्यास प्रोत्साहित करण्याच्या 'युक्ती'चा भाग म्हणून हा डान्स करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) च्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ 24 सप्टेंबर रोजी हेनान प्रांतातील आन्यांग येथील एका नर्सिंग होमच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता.या क्लिपमध्ये, एक महिला छोटे, स्कूल युनिफॉर्मसारखे कपडे आणि गुडघ्यांपर्यंतचे काळे मोजे परिधान करून, समोर बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीसमोर अश्लील डान्स करताना दिसत आहे.
( नक्की वाचा : Video : 9 महिन्यांची माया एका क्षणात संपली! नवजात बाळाला कचऱ्यात फेकणारी आई CCTV मध्ये कैद )
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते: "आमचे संचालक वृद्ध रुग्णांना औषधे घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत." व्हिडिओ सुरु असताना, एक अन्य कर्मचारी त्या वृद्ध व्यक्तीला औषधे देण्यासाठी त्यांच्याजवळ जाताना दिसत आहे.
नर्सिंग होमची भूमिका आणि वादाची सुरुवात
एससीएमपीनुसार, या नर्सिंग होमने त्यांच्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये स्वतःला '90 च्या दशकापूर्वीच्या एका संचालकाने चालवलेले एक आनंदी वृद्धाश्रम' असे वर्णन केले आहे, जे वृद्धांना आनंद देण्यासाठी आणि 'वृद्धापकाळात जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी' वचनबद्ध आहे.
हा व्हिडिओ पोस्ट होताच, चीनी सोशल मीडियावर या दृष्टिकोनाच्या नैतिकता आणि प्रतिष्ठेवर टीका करत तीव्र चर्चा सुरू झाली. "वृद्धाश्रमांमध्येही आता अश्लील डान्सचा ट्रेंड सुरू झाला आहे का?" अशी टीका एका नेटीझन्सनं केली.
नर्सिंग होमचे स्पष्टीकरण आणि व्हिडिओ हटवला
सार्वजनिक विरोधानंतर, 25 सप्टेंबर रोजी नर्सिंग होमच्या संचालकांनी 'नांगुओ मेट्रोपोलिस डेली'ला सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही वृद्धाश्रमात काळजी घेणारी कर्मचारी आहे, ती कोणतीही 'प्रोफेशनल डान्सर' नाही. इथे सहसा पत्त्यांचे खेळ (ताश) आणि गाणी (सिंगिंग) यांसारखे पारंपारिक उपक्रम आयोजित करतात, असं त्यांनी स्पष्ट केले.
एका अन्य कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की या डान्सचा उद्देश नर्सिंग होमची 'नीरस आणि बेजान' असल्याची रूढीवादी प्रतिमा मोडून काढणे हा होता, त्यांना हे दाखवायचे होते की वृद्धाश्रम देखील उत्साही असू शकतात. मात्र, त्यांनी या दृष्टिकोनावर 'मिश्र प्रतिक्रिया' मिळाल्याचे मान्य केले.
नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर, नर्सिंग होमने या घटनेशी संबंधित 100 हून अधिक व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून काढून टाकले आहेत.