Cyclone Wifa: विफा चक्रीवादळाचा दणका! प्रवासी बोट समुद्रात उलटली, 38 जणांचा मृत्यू

मी सुर्य प्रकाश पाहिला आणि त्या दिशेनं पोहत राहिलो. कसाबसा उलटलेल्या बोटीवर चढलो आणि त्यानंतर मला मदत मिळाली असं या अपघातातून वाचलेल्या प्रवाशाने सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins

अखेर विफा चक्रीवादळानं बळी घेतलेच. व्हिएतनामच्या दिशेनं घोंघावत येणाऱ्या या विफा चक्रीवादळात एक प्रवासी बोट अडकली आणि उलटली. यात सुमारे 38 जणांचा मृत्यू झालाय. हा लाँग बे या व्हिएतनामच्या काँग निन्ह प्रांतातल्या किनारी प्रदेशाजवळ ही दुर्घटना घडली. 18 जुलैपासून हे चक्रीवादळ दक्षिण चीन समुद्रात सक्रीय झालं. 22 जुलै दरम्यान हे वादळ जमिनीवर धडकणार आहे. मात्र त्याआधीच या वादळानं दक्षिण आशियाई देशांमध्ये विध्वंस घडवण्यास सुरुवात झाली आहे. व्हिएतनाम, थायलंड आणि फिलीपाईन्स हे देश सध्या विफा चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका व्हिएतनामला बसतोय. अशातच शनिवारी उत्तर व्हिएतनाममधील कांग निन्ह प्रांतातील हा लाँग बे या किनारी प्रदेशाजवळ बोटीचा अपघात झाला. वादळाच्या तडाख्यात सापडलेली प्रवासी बोट उलटली. त्यात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बोट किनाऱ्याकडे येत असतानाच अचानक सुरू आलेल्या वादळी वाऱ्याच्या कचाट्या ती सापडली. या बोटीवर  53 जण होते. त्यातील 48 जण पर्यटक तर 5 क्रू मेंबर्स होते. 

सारेजण व्हिएतनामचेच रहिवासी होते. बोट कलंडू लागताच काँग निन्ह प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीनं बचावकार्य सुरु केलं. त्यातून सुमारे 11 जणांना वाचवण्यात यश आलं. रविवारीदेखील शोधकार्य सुरुच ठेवण्यात आलं. दरम्यान नेमकं काय घडलं हे दुर्घटनेत बचावलेल्या पर्यटकांनी सांगितलं. त्याने सांगितलं, क्षणार्धात सगळं संपलं. बोट उलटायला एक मिनिटही लागला नाही. 15 मिनिटं धुवाधार पाऊस पडत होता. त्यानंतर बोट खूप जोरात हलू लागली. टेबल खुर्च्या सगळं काही इकडे तिकडे सरकू लागलं. काही सेकंदांमध्येच बोट उलटली. पाणी आत शिरलं आणि त्यानंतर आम्हाला काहीच कळेनासं झालं. आम्ही श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी जोरात श्वास घेतला आणि खाली गेलो. मी सुर्य प्रकाश पाहिला आणि त्या दिशेनं पोहत राहिलो. कसाबसा उलटलेल्या बोटीवर चढलो आणि त्यानंतर मला मदत मिळाली असं या अपघातातून वाचलेल्या प्रवाशाने सांगितलं. 

Advertisement

नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा

तुआल हा आपल्या विद्यापीठातील आपल्या मित्रांसह हालोंग बेवर फिरण्यासाठी गेला होता. तेव्हा ते सारे वादळाच्या तडाख्यात सापडले. मित्रांपैकी ते तिघेच बचावलेत. तुआनला किरकोळ जखमा झाल्यात मात्र त्याचा एक मित्र गंभीर जखमी आहे. व्हिएतनामला विफा चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिलाय. अद्याप वादळ जमिनीवर धडकलेलं नाही. त्याआधीच विफानं आपलं रौद्र रुप दाखवलं आहे. 22 जुलैपर्यंत व्हिएतनामच्या उत्तर परिसरात हे चक्रीवादळ जमिनीवर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या वादळामुळे वारे ताशी 99 ते 120 किमी वेगानं वाहत आहेत. त्यामुळे या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे आतापासूनच व्हिएतनाम आणि शेजारील देशांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Political news: ठाकरे-फडणवीसांची गुप्त भेट झाली का? फडणवीसांच्या जवळच्या मंत्र्याने सर्वच सांगितलं

व्हिएतनामच्या कृषी आणि पर्यावरण मंत्रालयानं तातडीनं आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील बैठक बोलावली आहे. यंदा व्हिएतनाममध्ये धडकणारं हे तिसरं भीषण वादळ आहे.यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच वातावरणातील अनाकलनीय बदल पाहत असल्याचं इथल्या सरकारी विभागानं सांगितलं आहे. व्हिपामुळे आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 19 जुलैपासूनच या वादळाचा जमिनीकडील वेग वाढणार आहे. पूर्व समुद्रातून हे वादळ देशात प्रवेश करेल. हे श्रेणी तीनचं वादळ म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. 20 जुलैपर्यंत पावसासह वादळ आणि विजांचा कडकडाटही अनुभवावा लागेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Political news: ठाकरे-फडणवीसांची गुप्त भेट झाली का? फडणवीसांच्या जवळच्या मंत्र्याने सर्वच सांगितलं

21-24 जुलै दरम्यान उत्तर व्हिएतनामसह उत्तर मध्य किनारी भागातही मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. साधारणपणे 200 ते 350  मिमी पाऊ पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हे प्रमाण 500 ते 600 मिमीवर जाण्याचा अंदाज आहे. जर चीनच्या किनारी भागाकडे हे वादळ सरकलं तर व्हिएतनामवरील या वादळाचा परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत व्हिएतनाम आणि इतर बेट राष्ट्रांना या विफाचा धोका आहे.