वांगं की भोपळा? 'या' भाजीने बनवलं जगातलं अनोखं रेकॉर्ड

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये दररोज कोणतेना कोणते अतिशय वेगळे आणि रंजक रेकॉर्ड होत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

World Biggest Eggplant Pics: जगात कधी काय होईल आणि कधी काय होणार नाही हे सांगता येत नाही. पण अशा काही घडामोडी होतात ज्यामुळे अनेक जण आश्चर्य चकीत होवून जातात. कधी तर आपल्याच डोळ्यांवर आपल्याला विश्वास बसत नाही. अशाच काही गोष्टी आणि घडामोडी विश्वविक्रम बनवून जातात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये दररोज कोणतेना कोणते अतिशय वेगळे आणि रंजक रेकॉर्ड होत असतात. पण काही रेकॉर्ड हे हैराण करणारे असतात. असचं एक रेकॉर्ड सध्या जगात चर्चेचा विषय ठरलं आहे. हे रेकॉर्ड कोणी व्यक्तीने नाही तर एका वांग्याने केलं आहे. तुम्हाला हे खोटं वाटेल पण हे खरं आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

3.77 किलेचे एक वांगं  (World Biggest Eggplant)

वांगं म्हटलं तर त्याचा एक विशिष्ठ आकार असतो. विशिष्ठ असं वजनही असतं. मात्र एका व्यक्तीने लावलेल्या वांग्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. हे वांगं आहे की भोपळा आहे असा प्रश्न हे वांगं पाहील्यानंतर सर्वांनाच पडला आहे. एखाद्या वांग्याचे वजन साधारण पणे 150 ते 200 ग्राम असते. काही वेळा तर या पेक्षा ही लहान वांगी आपल्याला पाहायला मिळतात. या वांग्याची लागवड  डेव बेनेट या व्यक्तेने केली आहे.  यांनी जे वांगं लावलं त्याचे वजन तब्बल  3.77 किलो भरलं आहे. हे एक रेकॉर्ड आहे. येवढ्या वजनाचं वांगं या आधी कुणीही उत्पन्न केलं नव्हतं. त्यामुळे या वांग्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये झाली आहे. 
 

Advertisement
Advertisement

हे वांगं सर्वांपेक्षा वेगळं का?

या वांग्याचा आकार एखाद्या भोपळ्या ऐवढा आहे. सर्व सामान्य वांग्या पेक्षा याचे वजन जवळपास दहा पट जास्त आहे. अमेरिकेत राहाणारे डेव यांनी याची लागवड एप्रिल महिन्यात केली होती. रेकॉर्ड किपरवर याबाबतची माहिती देण्यात आली होती. शिवाय हे जगातलं सर्वात मोठं वांगं असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. एप्रिलमध्ये लावण्यात आलेले हे वांगे 31 जुलैला कापण्यात आले. त्यानंतर त्याचे वजन ही करण्यात आले. त्यावेळी ते जगातले सर्वात मोठे वांगे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याची जागतीक विक्रमात नोंद झाली. 

Advertisement

वांगे पाहून सर्वच जण हैराण  (Guinness Book Of World Record)

या वांग्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.  गिनीज वर्ल्ड रिकॉर्डच्या अधिकृत इंस्टाग्राम @guinnessworldrecords वर तो शेयर करण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये सांगण्यात आले आहे की 'डेव बेनेट यांनी लावलेले वांगे हे  3.778 किलोचे आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने हा चमत्कार असल्याचे सांगत खरोखर हे रेकॉर्ड आहे असे म्हटले आहे. एकाने तर जबरदस्त असे म्हटले आहे तर एक जण असं होवू शकतं का असा प्रश्न करत प्रतिसाद दिला आहे.