France Protest : नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही जनआंदोलनाचा भडका; 'Block Everything' ने वाढवली मॅक्रॉनची डोकेदुखी

'Block Everything' Protest Rocks France : नेपाळमध्ये जेन-झेड (Gen Z) युवांच्या आंदोलनामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच आता फ्रान्समध्येही परिस्थिती बिघडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
France Protest : ब्लॉक एव्हरीथिंग' (Block Everything) नावाच्या गटाने सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई:

'Block Everything' Protest Rocks France : नेपाळमध्ये जेन-झेड (Gen Z) युवांच्या आंदोलनामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच आता फ्रान्समध्येही परिस्थिती बिघडली आहे. तिथे 'ब्लॉक एव्हरीथिंग' (Block Everything) नावाच्या गटाने सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.

फ्रान्समध्ये काय सुरु आहे?

फ्रान्सची राजधानी पॅरिससह अनेक शहरांमध्ये निदर्शकांनी रस्त्यावर उतरून रस्ते अडवले, जाळपोळ केली. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की पोलिसांना निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. गृहमंत्री ब्रुनो रिटेलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान सुमारे 200 लोकांना अटक करण्यात आली आहे. रेन शहरात एका बसला आग लावण्यात आली, तर दक्षिण-पश्चिमेकडील वीज वाहिनीचे नुकसान झाल्याने रेल्वे सेवा थांबवण्यात आली.

आंदोलनाचे कारण काय?

हे आंदोलन उन्हाळ्यात सोशल मीडिया आणि चॅट्सद्वारे सुरू झाले आणि आता त्याने मोठ्या आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. या आंदोलनासाठी कोणतेही एक स्पष्ट कारण नसले तरी, सरकारची धोरणे, अर्थसंकल्पातील कपात आणि सामाजिक असमानता यांसारख्या गोष्टींविषयी लोकांमध्ये असलेली नाराजी यामागे स्पष्ट दिसत आहे.

( नक्की वाचा : Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलकांचा हैदोस; माजी PM च्या पत्नीचा होरपळून मृत्यू, अर्थमंत्र्यांवर हल्ला, Video )
 

मॅक्रॉन सरकारसाठी आव्हान

फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता वाढलेली असतानाच हे आंदोलन सुरु झाले आहे.  नुकतेच पंतप्रधान फ्रँकोइस बेयरू यांनी संसदेतील विश्वासमत गमावले आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सेबॅस्टियन लेकॉर्नू यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. मात्र, लेकॉर्नू यांनी पदभार स्वीकारताच त्यांना या मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या 3 वर्षांपासून संरक्षण मंत्री असलेले लेकॉर्नू हे मॅक्रॉन यांच्या जवळचे मानले जातात आणि आता त्यांच्यावर हे मोठे राजकीय संकट हाताळण्याची जबाबदारी आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article