Girl Photoshoot With Crocodile Goes Viral: पदवीधर झाल्यावर विद्यार्थी अनेकदा पालकांसोबत किंवा मित्रांसोबत फोटोशूट करतात.पण अमेरिकेच्या एका मुलीनं ग्रज्युएट झाल्यावर अनेकांना थक्कच केलं आहे. पदवी मिळाल्याच्या आनंदात या महिलेनं असं काही केलं की,अनेकांच्या पायाखालची जमिनच सरकली. 14 फूट लांब मगरीच्या जबड्याजवळ जाऊन तिने फक्त पोजच दिली नाही,तर त्या मगरीला किसही केलं. या मुलीचा मगरीसोबतचा हा खतरनाक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुलीने मगरीसोबत केला फोटोशूट
मॅकनीस स्टेट यूनिव्हर्सिटीच्या कॅट डेलीने तिची पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने असं काही भन्नाट करायचा विचार केला की,जे अनेकांच्या लक्षात राहिल. तिने नेव्ही ब्लू गाऊन घालून डोक्यावर ग्रॅज्युएशन कॅप घातली. त्यानंतर ती थेट पाण्यात उतरली आणि 14 फूट लांब मगरीजवळ गेली. हद्द तर तेव्हाच झाली, जेव्हा तिने मगरीच्या उघडलेल्या जबड्यावर किस केलं.
नक्की वाचा >> Engineering साठी भारताचे टॉप-10 कॉलेज, 12 वी नंतर 'असं' मिळेल अॅडमिशन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर
काय आहे या खतरनाक खेळामागचं सत्य?
खरंतर कॅट ट्रेनी नाहीय. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत 'गेटर कंट्री'नावाचं रेस्क्यू पार्क चालवते. ती 7 वर्षांच्या वयापासूनच जंगली प्राण्यांमध्ये खेळली आहे. फोटोशूट दरम्यान फोटोग्राफरला मगरीपेक्षा जास्त भीती एका विषारी सापाची वाटत होती. ज्याला कॅटने एका खेळण्यासारखं पकडलं होतं.त्यांना लोकांना फक्त हे सांगायचं आहे की,मगरींबाबत चुकीची माहिती पसरवली जाते.
नक्की वाचा >> Ahilyanagar News : खंडाळा परिसरात नागरिकांची धडधड वाढली, 15 दिवसांपासून मानवी वस्तीत सुरु होता भयानक प्रकार
मगरी तेवढ्या आक्रमक नसतात. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.पण राहत्या घरी किंवा इतर ठिकाणी अशाप्रकारे मगरींना पकडण्याचा प्रयत्न करू नका.कॅट मगरींना हाताळण्याच्या बाबतीत खूप अनुभवी आहे.ग्रॅज्युएशन फोटोशूटसाठी ही आतापर्यंतची सर्वात जीवघेणी आणि अनोखी पद्धत आहे.