Reason Behind Worldwide Internet Outage: ऐन दिवाळीत इंटरनेटचा फ्युज उडाला, काय होते कारण ? जाणून घ्या

Major Internet Outage: केवळ सोशल मीडिया किंवा ई-कॉमर्स सेवाच नव्हे, तर गेमिंग प्लॅटफॉर्मलाही याचा फटका बसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Reason Behind Worldwide Internet Outage: सोमवारी जगातील काही मोठ्या वेबसाइट्स आणि ॲप्स अचानक बंद पडल्यामुळे जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड (Cloud) सेवेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ॲमेझॉन (Amazon), गुगल (Google), स्नॅपचॅट (Snapchat), रोब्लॉक्स (Roblox), फोर्टनाइट (Fortnite) आणि कॅनव्हा (Canva) यांसारख्या महाकाय कंपन्यांच्या सेवा ठप्प झाल्या. भारतातील असंख्य इंटरनेट वापरकर्त्यांना सोमवारी सकाळी या आउटेजचा मोठा त्रास सहन करावा लागला. डाउन डिटेक्टरवर हजारो युजर्सनी तक्रारींचा पाऊस पाडला, ज्यामुळे या समस्येची व्याप्ती किती मोठी होती हे स्पष्ट झाले.

नक्की वाचा: 15 वर्षांच्या हिंदू मुलीनं इस्लाम स्विकारला, 7 मुलींच्या बापासोबत निकाह रचला

 काय आहे या बिघाडामागील कारण ?  (Why Internet Service was Down?)

या मोठ्या आउटेजचे मुख्य कारण ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) मधील बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. AWS हा एक क्लाऊड प्लॅटफॉर्म आहे, जो जगातील हजारो वेबसाइट्स आणि ॲप्ससाठी सर्व्हर, डेटाबेस आणि स्टोरेज पुरवतो. थोडक्यात, बहुतांश इंटरनेटचा पायाच AWS वर अवलंबून असल्याने, या मुख्य सेवेत बिघाड होताच, त्याचा परिणाम जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांवर झाला. युरोप, आशिया आणि अमेरिकेतील लाखो युजर्सना यामुळे थेट फटका बसला.

इंटरनेट डाऊन असल्याचा फटका कोणा-कोणाला बसला ?

केवळ सोशल मीडिया किंवा ई-कॉमर्स सेवाच नव्हे, तर गेमिंग प्लॅटफॉर्मलाही याचा फटका बसला. Roblox, Clash Royale, Clash of Clans, Fortnite आणि Pokémon Go यांसारख्या गेम्समध्ये लॉगिन करणे आणि अविरत कनेक्शन राखणे अवघड झाले. यूकेची टॅक्स वेबसाइट एचएमआरसी (HMRC) आणि फ्रेंच टेलिकॉम कंपन्या एसएफआर (SFR) आणि फ्री (FREE) यांच्या सेवांवरही या आउटेजचा परिणाम झाला. यावरून क्लाऊडवर आधारित सेवांच्या एका केंद्रीकरणामुळे होणाऱ्या मोठ्या धोक्याची जाणीव होते.

नक्की वाचा: महिलेने ChatGPTला कामाला लावले, अन् जिंकले 88,00,000 रुपये, असं काय घडलं?

AWS ने इंटरनेट सेवा ठप्प झाल्याबद्दल काय म्हटले ? (AWS Release Statement on Internet Connectivity Issue)

AWS ने यासंदर्भात निवेदन जारी केले असून, तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे आणि सेवा हळूहळू पूर्ववत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. Snapchat, Slack, Signal, Tinder आणि Canva यांसारख्या सेवांना यामुळे फटका बसला.

Advertisement
Topics mentioned in this article