इस्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, हिजबुल्लाहनं केला ड्रोन अटॅक

हिजबुल्लाहनं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu)  यांच्या घराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिजबुल्लाहनं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu)  यांच्या घराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. इस्रायल सरकारनं या हल्ल्याची माहिती दिली आहे. शनिवारी सकाळी पंतप्रधानांच्या घराच्या दिशेनं एक ड्रोन लॉन्च केलं होतं, यामध्ये कुणीही जखमी झालं नाही. 

इस्रायल सरकारनं सांगितलं की, शनिवारी सकाळी देशात सायरन वाजू लागले. त्यामध्ये लेबनानच्या दिशेनं होणाऱ्या गोळीबाराचा इशारा देण्यात आला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेनं एक ड्रोन लॉन्च करण्यात आलं होतं. हा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी घरी नव्हत्या. तसंच यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं (IDF)  नुकत्याच केलेल्या हल्ल्यात लेबनानमधील हिजबुल्लाह बटालियनचा कमांडर हुसेन मोहम्मद अवदा मारला गेला होता. आयडीएफनं हल्ल्याची वेळ आणि जागेची माहिती न देता याबाबत माहिती दिली होती. 23 सप्टेंबरपासून इस्रायली सैम्य लेबनावर हवाई हल्ले करत आहे. 

त्यापूर्वी लेबनामध्ये 17 सप्टेंबर रोजी संपर्कासाठी वापरण्यात येणाऱ्या  हजारो पेजरमध्ये एकाचवेळी स्फोट झाले. या घटनेत  3000 हजारांपेक्षा जास्त जण जखमी झाले. त्यानंतर हिजुबुल्लाहच्या अनेक सदस्यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  हिजुबुल्लाहनं या इस्रायल या स्फोटाला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

( नक्की वाचा : Iran Attacks Israel Video : पश्चिम आशियातील संघर्षाला मोठं वळण, इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला )

हमासच्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये शेकडो नागरिक ठार झाले. तसंच अनेकांचं अपहरण झालं. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियामधील परिस्थिती बिघडली आहे. गाझापट्टीमध्ये इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. त्याचबरोबर लेबनान आणि इस्रायलमधील संबंधही बिघडले आहेत. इस्रायलनं लेबनानवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्याचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं बदला घेतला जाईल, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी जाहीर केलं आहे.