HMPV : चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या व्हायरसची एन्ट्री? हॉस्पिटलमध्ये रांगा, वाचा लक्षणं आणि उपाय

HMPV in China : कोरोनाची दहशत ताजी असतानाच आणखी एका खतरनाक व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

HMPV in China : चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभर विनाश केला. जगातील प्रत्येक देशाला कोरोना व्हायरसचा फटका बसला. अजूनही काही क्षेत्र या फटक्यातून संपूर्ण सावरले नाहीत. कोरोनाची दहशत ताजी असतानाच आणखी एका खतरनाक व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर सध्या चीनमधील हॉस्पिटल्समधील फोटो व्हायरल होत आहेत. ते फोटो अत्यंत भीतीदायक आहेत. चीनमधील नागरिकांना ह्यूमन मेटाप्नेयूमोवायरस (HMPV) सह आणखी काही व्हायरसच्या संसर्ग झाला आहे. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्ती आजारी पडत आहेत. इन्फ्लुएंजा ए आणि माइकोप्लाज्मासारख्या व्हायरसचा देखील यामध्ये समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे HMPV?

HMVP व्हायरसमध्ये सामान्यत: सर्दीची लक्षणं दिसतात. या व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींवर होत आहे. त्यामुळे या व्यक्ती गंभीर आजारी पडत आहेत. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या नागरिकांना खोकला, ताप, नाक कोंडणे हे त्रास सहन करावे लागतात. या आजारामुळे रुग्ण न्यूमोनिया आणि ब्रोंकियोलाइटीस सारख्या गंभीर आजारानं पीडित होऊ शकतात. 

कोरोनासारखा पसरतोय व्हायरस

या व्हायरसचा प्रसार कोरोनासारखा वेगानं होत असल्याची माहिती आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून हा व्हायरस पसरतो. विषाणूची लागण झालेल्या पृष्ठभागांना स्पर्श केल्यास संसर्ग होण्याचा धोका असल्याचं बोललं जात आहे. साधारण 2 ते 5 दिवसांमध्ये तुम्ही या आजारातून बरे होऊ शकता.

Advertisement

कुणाला सर्वाधिक धोका?

HMPV मध्ये वृद्ध व्यक्ती तसंच लहान मुलांना श्वसनालसंबधीचे आजार होऊ शकतात. दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) किंवा फुफ्फुसाच्या आजाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींना HMPV चा अधिक धोका असल्याची कोणतीही  माहिती नाही. पण, या आजारानं एकदा संक्रमित झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकतो. त्याचबरोबर केमोथेरिपीचे पेशंट्स तसंच अंग प्रत्यारोपण केलेल्या नागरिकांनाही या आजारा धोका आहे. 

( नक्की वाचा : Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा बंडाचा वणवा, हसीनानंतर युनूस यांची सत्ताही जाणार? )

HMPV पासून बचाव कसा करणार?

कोरनो व्हायरसच्या काळात कोरोना होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेत होतो तशीच साधारण काळजी या आजाराची लागण होऊ नये म्हणून घेणे आवश्यक आहे. HMPV संसर्गापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची काळजी आवश्यक आहे. त्यामध्ये

Advertisement
  •  साबण आणि पाण्याने हात नियमित धुणे आवश्यक आहे. किमान 20 सेकंद साबणाने हात धुणे आवश्यक आहे.
  •  न धुतलेल्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा
  •  या प्रकारच्या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून पुरेसे अंतर (Social distance) राखा
  •  दरवाजाचे हँडल, तसंच लहान मुलांच्या खेळणी या सारख्या गोष्टी नियमित स्वच्छ ठेवा.

WHO नं काय सांगितलं?

चीनमधील या नव्या व्हायरसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पण, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत अद्याप काहीही सांगितलेलं नाही. चीनमध्ये या प्रकारचा व्हायरस असल्याची कोणतीही पृष्टी WHO नं अद्याप दिलेली नाही.  
 

Topics mentioned in this article