Dog lovers: कुत्र्यासाठी काही पण! आधी दुबईला नेलं मग ऑस्ट्रेलियाला आणलं, 15 लाख खर्च करून त्यांनी...

'स्काय'ला भारतात सोडून जाणे त्यांना मान्य नव्हते. त्याला सोबत नेण्यासाठी त्यांनी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भारतातून ऑस्ट्रेलियात थेट कुत्रा नेण्यास कडक नियम असून भारताला रेबीजमुक्त देश मानले जात नाही
  • कुत्र्याला ऑस्ट्रेलियात नेण्यासाठी प्रथम सहा महिने रेबीजमुक्त देशात ठेवणे अनिवार्य आहे
  • दुबईत स्काय नावाच्या कुत्र्याला बोर्डिंग फॅसिलिटीमध्ये ठेवले गेले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Pet Travel India To Australia: भारतातून थेट ऑस्ट्रेलियात पाळीव प्राणी नेण्यावर कडक निर्बंध आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, भारतातून थेट कुत्र्यांना प्रवेश दिला जात नाही. यासाठी संबंधित प्राण्याला आधी सहा महिने रेबीजमुक्त देशात ठेवणे अनिवार्य आहे. याच कारणामुळे या दाम्पत्याने आपल्या 'स्काय' नावाच्या कुत्र्याला प्रथम दुबईला पाठवले. स्कायला दुबईतील एका बोर्डिंग फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आले होते. हे दाम्पत्य स्वतः एक महिना दुबईत त्याच्यासोबत राहिले. जेणेकरून त्याला नवीन वातावरणाची सवय होईल. त्यानंतरचे सहा महिने त्यांनी केवळ व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क ठेवला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रवास आणि राहण्याच्या खर्चासह एकूण 15 लाख रुपये खर्च झाले.

केवळ करिअरसाठी नव्हे, तर आपल्या कुटुंबातील एका महत्त्वाच्या सदस्याला सोबत नेण्यासाठी या दाम्पत्याने ही मोठी रक्कम खर्च केली. नियमांच्या जंजाळातून मार्ग काढत अखेर 'स्काय' ऑस्ट्रेलियात आपल्या मालकांकडे पोहोचला आहे. हैदराबादच्या एका तरुण जोडप्याने ऑस्ट्रेलियाला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा.

नक्की वाचा - घर बसल्या PF बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या 3 सोप्या आणि प्रभावी पद्धती, 1 मिनिटात सर्व माहिती

'स्काय'ला भारतात सोडून जाणे त्यांना मान्य नव्हते. त्याला सोबत नेण्यासाठी त्यांनी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली होती. अखेर त्यांनी 15 लाख रुपये खर्चून त्याला ऑस्ट्रेलियाला नेलेच. ऑस्ट्रेलियाचे प्राणी आयात नियम अतिशय कडक आहेत. भारताला 'रेबीज फ्री' देशांच्या यादीत स्थान नसल्याने स्कायला थेट नेता येत नव्हते. त्यामुळे त्याला आधी दुबईला पाठवण्यात आले. तिथे सहा महिने राहिल्यानंतरच त्याला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळाला.

नक्की वाचा - Trending News: ऑस्ट्रेलियात भारतीय टॅक्सी ड्रायव्हरची 10 तासात किती कमाई? भारतात तेवढ्या कमाईसाठी लागतात...

"स्कायशिवाय राहणे आमच्यासाठी खूप कठीण होते," असे या दाम्पत्याने सांगितले. सहा महिने केवळ मोबाईलवर त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून त्यांनी दिवस काढले. दुबईत त्याच्या बोर्डिंगचा आणि प्रवासाचा खर्च लाखांच्या घरात गेला, मात्र 'स्काय' सोबत आल्याचा आनंद या खर्चापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या कुत्र्यावरचं हो प्रेम पाहून सर्वांनाच कौतूक वाटत आहेत. त्याचा एक व्हिडीओ ही सध्या व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रीया ही देत आहेत. 
 

Advertisement