India-Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाला संधी मिळाली नव्हती. या कालावधीमध्ये अरबी समुद्रात फारशी हालचाल दिसली नाही. मात्र, आता अरबी समुद्रातील हालचाल वाढली आहे. भारत आणि पाकिस्तानचे नौदल एकाच वेळी फायरिंग ड्रिल करणार आहेत आणि दोन्ही देशांच्या नौदलांनी नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग जारी केली आहे.
भारत आणि पाकिस्तानचे नौदल आपापल्या परिसरात सब-सरफेस फायरिंग ड्रिल करणार आहेत. दोन्ही देशांनी यासाठी नेव्हिगेशन एरिया वॉर्निंग जारी केली आहे. या वॉर्निंगनुसार, सागरी वाहतुकीला सरावाच्या भागापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
भारताकडून 3 NAVAREA WARNINGs
भारतानेही 3 NAVAREA WARNINGs जारी केल्या आहेत. या वॉर्निंग्ज खालीलप्रमाणे आहेत:
- ओखा किनाऱ्याजवळ जारी केलेल्या वॉर्निंगनुसार, नौदल 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत फायरिंग ड्रिल करणार आहे.
- 12 ऑगस्टसाठी पोरबंदर किनाऱ्याजवळ जारी केलेल्या वॉर्निंगनुसार, नौदल मध्यरात्री 12:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत फायरिंग ड्रिल करणार आहे.
- तिसरी वॉर्निंग मोरमुगाओ किनाऱ्याजवळ 13 ऑगस्टसाठी जारी करण्यात आली आहे, जिथे रात्री 1:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फायरिंग ड्रिलमुळे सर्व सागरी वाहतुकीला या भागापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानचा 11 ऑगस्टला सराव
पाकिस्तानने जारी केलेल्या NAVAREA WARNING नुसार, 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजेपासून ते 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सागरी वाहतुकीला सरावाच्या भागापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.