पाकिस्तानची अवस्था बिकट, भावाच्या मदतीसाठी लंडनहून धावले नवाज शरीफ, दिला महत्त्वाचा सल्ला

India Pakistan Tension : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची अवस्था बिकट झालीय. शाहबाज यांची ही अवस्था बिकट झाल्यानंतर त्यांचे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परतले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सध्या वाढला आहे. त्यामध्ये पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताननं केलेले ड्रोन हल्ले भारतानं परतावून लावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तान कोडींत सापडल्याचं चित्र आहे. त्यामुळे साहजिकच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ  (Shehbaz Sharif) यांची अवस्था बिकट झालीय. शाहबाज यांची ही अवस्था बिकट झाल्यानंतर त्यांचे भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif)  पाकिस्तानमध्ये परतले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नवाज शरीफ हे लंडनमध्ये होते. ते भावाच्या मदतीला धावत-पळत पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भारतबरोबरच तणाव कमी करा आणि पाकिस्ताननं शांततेनं काम करावं असा सल्ला शरीफ यांनी दिला आहे. पाकिस्तानचे न्यूज पोर्टल द एक्स्प्रेस ट्रिब्यूननं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

शरीफनं पाकिस्तान सरकारला भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारच्या राजकीय उपायांचा वापर करण्यास सांगितले आहे. भारताविरुद्ध आक्रमक धोरण राबवण्यास शरीफ उत्सुक नसल्याचं यामधून स्पष्ट झालं आहे. 

( नक्की वाचा : पाकिस्तानी नागरिकांनं काढले स्वत:च्याच देशाचे वाभाडे, Video पाहून प्रत्येक भारतीय होईल खुश )
 

भारताबरोबर 1999 साली झालेल्या युद्धाच्या वेळी नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. आपण कारगिल युद्धाला विरोध केला त्यामुळे आपल्याला पदावरुन हटवण्यात आले, असा दावा शरीफ यांनी केला होता. कारगिल युद्धात पाकिस्तानचा सपाटून पराभव झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी त्यांना पदावरुन दूर केलं होतं. 

Advertisement

भारतानं वाचला पाढा

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं केलेल्या सर्व कुरापतींची माहिती परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्यानं देशासमोर ठेवली आहे. शुक्रवारी (9 मे) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी पाकिस्ताननं केलेल्या चिथावणीखोर कृत्याची माहिती दिली.

भारतीय सशस्त्र दलानं अतिशय जबाबदारीनं उत्तर दिलं आहे. त्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्ताननं 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्ताननं भारतीय सैन्याची ठिकाणं पाकिस्तानचे लक्ष्य होते. त्याचबरोबर त्यांनी एलओसीवर (लाईन ऑफ कंट्रोल) देखील गोळीबार केला. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्ताननं 8 आणि 9 मे च्या रात्री रहिवाशी भागांनाही लक्ष्य केले. 

Advertisement
Topics mentioned in this article