- तुषार बरेजा या भारतीय कंटेंट क्रिएटरने ऑस्ट्रेलियात 10 तास उबर कॅब चालवून 330 ऑस्ट्रेलियन डॉलर कमावले
- 330 ऑस्ट्रेलियन डॉलरचे मूल्य भारतीय चलनात सुमारे २०,८६३ रुपये इतके आहे
- भारतात दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये कॅब चालक दिवसभर काम करूनही 3,000 ते 4,000 रुपये कमवतात
Cab Driver Income Australia: परदेशात जाऊन स्थायिक होण्याचे आणि डॉलरमध्ये कमाई करण्याचे आकर्षण भारतीयांमध्ये कायम आहे. अलीकडेच तुषार बरेजा या भारतीय कंटेंट क्रिएटरने ऑस्ट्रेलियात 10 तास 'उबर' (Uber) चालवून किती कमाई होते, याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे भारत आणि विकसित देशांमधील मजुरीच्या दरातील मोठी तफावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंटही आल्या आहेत. तर अनेकांनी परदेशात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
तुषारने दिलेल्या माहितीनुसार, त्याने ऑस्ट्रेलियात सलग 10 तास कॅब चालवली. या कामातून त्याला 330 ऑस्ट्रेलियन डॉलर मिळाले. ज्याचे भारतीय चलनात मूल्य जवळपास 20,863 रुपये इतके होते. भारतात एका कॅब चालकाला इतकी रक्कम कमावण्यासाठी साधारणतः एक महिना कष्ट करावे लागतात. तुषारने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर त्याला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दिल्ली किंवा मुंबईसारख्या महानगरांमध्ये दिवसाला 12-14 तास काम करूनही कॅब चालकाचे उत्पन्न 3,000 ते 4000 रुपयांच्या वर जात नाही. याउलट, परदेशात तासाच्या हिशोबाने मिळणारे मानधन अधिक आहे. भारतीय तरुणांचा ओढा परदेशातील अशा कामांकडे वाढत असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते. तुषारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यातून त्याने जणू एक डेमोच दाखवला आहे. ऑस्ट्रेलियातील सत्य परिस्थिती त्याने यातून मांडली आहे.
तुषारने त्याच्या @tusharbareja23 या इंस्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. भारतात जिथे पदवीधरांना महिनाभर काम करून 15-20 हजार रुपये मिळतात, तिथे हा तरुण एका दिवसात तेवढी रक्कम कमवत आहे. हे पाहून अनेकांनी "आता आपणही ऑस्ट्रेलियालाच जायला हवं," अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. मेहनत तीच, पण किंमत जास्त असा हा अनुभव आहे. भारतात ओला-उबर चालवणारे ड्रायव्हर दिवसभर राबूनही जेमतेम हजार दोन हजार कमवू शकतात. पण परदेशात हीच कमाई किती तरी पटीने जास्त आहे.