Video : रस्त्यावर घरंगळत गेले शीर, आरोपीने उचलून फेकले कचरापेटीत; भारतीय मॅनेजरच्या हत्येने अमेरिका हादरली

Indian Man Beheaded in Front of Wife in Texas : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका 50 वर्षीय भारतीय मोटेल व्यवस्थापकाची पत्नी आणि मुलासमोरच हत्या करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 3 mins
या प्रकरणातील आरोपी क्युबामधून अमेरिकेत काम करण्यासाठी आला होता.
मुंबई:

Indian Man Beheaded in Front of Wife in Texas : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका 50 वर्षीय भारतीय मोटेल व्यवस्थापकाची पत्नी आणि मुलासमोरच हत्या करण्यात आली. मूळचे कर्नाटकाचे असलेल्या चंद्र मौली नागमल्लैया यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्याने कुऱ्हाडीने वार करून त्यांचे शीर धडावेगळे केले. या प्रकरणातील आरोपी क्युबामधून अमेरिकेत काम करण्यासाठी आला होता. त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड होते, आणि  तो मृतासोबतच काम करत होता. या हत्याकांडाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना बुधवार, 10 सप्टेंबर (स्थानिक वेळेनुसार) रोजी डलास येथील डाउनटाउन सुइट्स मोटेलमध्ये सकाळी घडली. पन्नास वर्षीय चंद्रा नागमल्लैया या मोटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. 37 वर्षीय योर्डानिस कोबोस-मार्टिनेजने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वारंवार वार केले.

मोटेलचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे, ज्यात पांढऱ्या शर्टमधील आरोपी कुऱ्हाड घेऊन नागमल्लैयाचा पाठलाग करताना दिसत आहे. नागमल्लैया यांनी मदतीसाठी हाक मारल्यावर त्यांची पत्नी आणि 18 वर्षांचा मुलगा तिथे आले आणि त्यांनी अनेकदा मारेकऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की कोबोस-मार्टिनेजने त्यांना दूर ढकलले आणि वार करणे सुरूच ठेवले.

( नक्की वाचा : Nepal Crisis : नेपाळमध्ये 'राजा' पुन्हा येणार? राजेशाहीच्या मागणीला जोर; कोण आहे Gen Z युवराज हृदयेंद्र शाह? )
 

एका क्षणी पिवळा शर्ट घातलेला नागमल्लैयाचा मुलगा कुठूनतरी बेसबॉलचा बॅट घेऊन येतो. पण तोपर्यंत त्याच्या वडिलांचा प्राण गेला होता. कोबोस-मार्टिनेजने नंतर नागमल्लैयाच्या खिशातून काहीतरी काढले. त्यानंतर कुऱ्हाडीने तोपर्यंत वार केले जोपर्यंत नागमल्लैयाचे शीर शरीरापासून वेगळे झाले नाही.  नागमल्लैयाच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी, नागमल्लैयाच्या मुलाने आपल्या आईला घटनास्थळावरून दूर नेले.

Advertisement

पोलिसांनी सांगितले की, नागमल्लैयाचे शीर कापल्यानंतर, "आरोपीने त्यांच्या डोक्याला पार्किंगच्या ठिकाणी दोनदा लाथ मारली, ते उचलले आणि कचरापेटीत नेऊन टाकले." पोलिसांनी सांगितले की, एक अग्निशमन आणि बचाव पथकाचा ट्रक घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी त्यांनी पाहिले की आरोपी अजूनही हातात कुऱ्हाड घेऊन आहे आणि रक्ताने माखलेला आहे. त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेईपर्यंत त्याचा पाठलाग करण्यात आला.

( नक्की वाचा : जर्मनीमध्ये स्थायिक होण्याची हीच वेळ! केवळ 11,500 रुपयांपेक्षा कमी खर्चात कायमस्वरूपी संधी, वाचा सविस्तर )
 

फक्त 'या' क्षुल्लक गोष्टीवरून केली हत्या

कोबोस-मार्टिनेजचा टेक्सासच्या ह्यूस्टन शहरात गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, ज्यात वाहन चोरी आणि हल्ल्यासाठी अटकही समाविष्ट आहे. त्याला आता अटकेनंतर बॉन्डशिवाय ठेवण्यात आले आहे. दोषी आढळल्यास त्याला पॅरोलशिवाय आजीवन कारावास किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.

Advertisement

गुरुवारी पोलिसांनी जारी केलेल्या अटक प्रतिज्ञापत्रातून या हत्येचं कारण समोर आलंय. त्यानुसार कोबोस-मार्टिनेज आणि मृतामध्ये वाद झाला होता. एका साक्षीदाराने पोलिसांना सांगितले की ती आरोपीसोबत एक खोली साफ करत होती. त्याचवेळी नागमल्लैया तिथे आले आणि त्यांनी वॉशिंग मशीनचा वापर न करण्यास सांगितले, कारण ती खराब झाली होती. याच प्रकरणाचा राग येऊन आरोपीनं ही भयंकर हत्या केली. 

Topics mentioned in this article