- इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांच्या २०० अब्ज डॉलरच्या संपत्तीची चर्चेत
- खामेनेई यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत सेताद संस्था असून, तिच्या नियंत्रणाखाली ९५ अब्ज डॉलरची मालमत्ता होती
- खामेनेई यांच्या संपत्तीमध्ये जप्त मालमत्ता, रिअल इस्टेट आणि विविध क्षेत्रातील गुंतवणुका यांचा समावेश आहे
Iran Supreme Leader Khamenei Net Worth: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांच्या अफाट संपत्तीची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली आहे. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी, रॉयटर्स आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, खामेनेई हे सुमारे 200 अब्ज डॉलरच्या म्हणजेच जवळपास 16 लाख कोटी रुपये आर्थिक साम्राज्याचे मालक होते. ही संपत्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (7.3 अब्ज डॉलर) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (13 दशलक्ष डॉलर) यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. मात्र खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा खरा मालक कोण याची ही चर्चा सुरू झाली आहे.
खामेनेई यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत 'सेताद' (SETAD) ही संस्था आहे. 2013 च्या अहवालानुसार, या संस्थेच्या नियंत्रणाखाली 95 अब्ज डॉलरची मालमत्ता होती. जप्त केलेली मालमत्ता, रिअल इस्टेट आणि विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या माध्यमातून हे साम्राज्य उभे राहिले आहे. आता त्यांच्या मृत्यूनंतर या अफाट संपत्तीचा आणि इराणच्या सत्तेचा वारसदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांचे नाव आघाडीवर असले, तरी इराणमधील 'असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स' कोणाची निवड करते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
इस्रायल आणि अमेरिकेच्या 'सर्जिकल डिकॅपिटेशन'मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा खात्मा झाला. कधीकाळी तुरुंगात यातना सोसणारे खामेनेई 1989 मध्ये सत्तेवर आले. त्यांनी साडेतीन दशके इराणवर राज्य केले. या काळात त्यांनी उभ्या केलेल्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. फोर्ब्स आणि इतर अहवालांनुसार, खामेनेईंच्या नियंत्रणाखालील नेटवर्कची किंमत 200 अब्ज डॉलरपर्यंत असू शकते. ही संपत्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपत्ती पेक्षा ही जास्त आहे.
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याला सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, अयातुल्ला अलीरेझा अराफी आणि मोहसेन अराकी यांसारखी दिग्गज नावेही शर्यतीत आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सची (IRGC) भूमिका या नियुक्तीत निर्णायक ठरणार आहे. 36 वर्षांची राजवट संपल्यानंतर आता इराणचा नवा 'सुल्तान' कोण होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इराणच्या संविधानानुसार 88 धार्मिक विद्वानांची परिषद (Assembly of Experts) नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करते. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत ही प्रक्रिया पार पाडणे मोठे आव्हान आहे. मोजतबा खामेनेई यांच्यासह अयातुल्ला गुलाम हुसेन मोहसेनी आणि आयतुल्लाह हशेम हुसैनी बुशेहरी यांची नावे वारसदार म्हणून चर्चेत आहेत. खामेनेईंच्या मागे राहिलेली ही अफाट मालमत्ता आणि इराणचे भविष्य आता कोणाच्या हाती जाते, हे येणारा काळच ठरवेल.