Israel Iran War: 50 विमानांचा हल्ला आणि खामेनींचा बंकर झाला ढिगारा; इस्रायलने जारी केला मृत्यूचा Live Video

Ayatollah Ali Khamenei death video: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा कसा झाला, याचा थरारक व्हिडिओ आता इस्रायलने अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ayatollah Ali Khamenei death video: अवघ्या काही सेकंदात खामेनींचा पूर्ण बंकर धुळीला मिळाला
मुंबई:

Ayatollah Ali Khamenei death video: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा कसा झाला, याचा थरारक व्हिडिओ आता इस्रायलने अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये इराणच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेला आणि अत्यंत सुरक्षित मानला जाणारा भूमिगत बंकर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळताना दिसत आहे. 50 लढाऊ विमानांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात खामेनी यांच्या सुरक्षित किल्ल्याचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे.

50 लढाऊ विमानांचा थरार आणि अचूक टार्गेट

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इस्रायली हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानच्या मध्यवर्ती भागात ही मोठी लष्करी कारवाई केली. या विशेष मोहिमेत इस्रायलची तब्बल 50 लढाऊ विमाने एकाच वेळी सहभागी झाली होती. 

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या विमानांनी खामेनी यांच्या भूमिगत बंकरवर एकापाठोपाठ एक शक्तिशाली बॉम्बचा वर्षाव केला. अवघ्या काही सेकंदात पूर्ण बंकर धुळीला मिळाला असून आकाशात धुराचे लोट पसरले आहेत.

( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )

मोसादचा प्लॅन आणि ऑपरेशन रोरिंग लायन

हा संपूर्ण हल्ला इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने दिलेल्या पक्क्या माहितीच्या आधारावर करण्यात आला. या मोहिमेला ऑपरेशन रोरिंग लायन असे नाव देण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, खामेनी यांना वाचवण्यासाठी बनवण्यात आलेल्या या बंकरचा वापर त्यांना कधीच करता आला नाही. 

Advertisement

या मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर इराण प्रशासनातील इतर 40 वरिष्ठ अधिकारी या बंकरचा वापर करत होते, ज्यांना आता इस्रायलने लक्ष्य केले आहे.

( नक्की वाचा : Iran War : अमेरिकन फायटर जेट्स भारत कधीही खरेदी का करत नाही? वाचा अमेरिकेच्या 'डबल गेम'ची ती जुनी गोष्ट! )

अनेक वर्षांची मेहनत 40 सेकंदात मातीत

इराणी सत्ताधाऱ्यांनी हा भूमिगत बंकर तयार करण्यासाठी अनेक वर्षे खर्च केली होती. इस्रायल आणि पाश्चात्य जगाविरोधात लष्करी कारवायांचे नियोजन करण्यासाठी हे एक सुरक्षित ठिकाण होते. मात्र, इस्रायली हवाई दलाने केवळ 40 सेकंदात या संपूर्ण तळाचा विनाश केला आहे. आणीबाणीच्या काळात सुरक्षित राहता यावे, यासाठी तयार करण्यात आलेली ही हायटेक यंत्रणा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या व्हिडिओमुळे इराणच्या लष्करी शक्तीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
 

Advertisement

इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ

Topics mentioned in this article