एका चुकीमुळे गेली ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची खुर्ची! कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्याचं 'एपस्टीन कनेक्शन' काय?

UK PM Keir Starmer Resigns: देशातील राजकीय अस्थिरतेचा अंत करण्याचे आश्वासन देत कीर स्टार्मर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
UK PM Keir Starmer Resigns: कीर स्टार्मर यांनी 5 जुलै 2024 रोजी ब्रिटनची सत्ता हाती घेतली होती.
मुंबई:

UK PM Keir Starmer Resigns: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिला आहे. देशातील राजकीय अस्थिरतेचा अंत करण्याचे आश्वासन देत कीर स्टार्मर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. पण, स्टार्मर यांना अवघ्या दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सोमवारी एका अत्यंत भावूक पत्रकार परिषदेत त्यांनी मजूर पक्षाच्या (लेबर पार्टी) नेतेपदाचा राजीनामा जाहीर केला. अंतर्गत बंडाळी, निवडणुकांमधील दारुण पराभव आणि एका चुकीच्या नियुक्तीमुळे थेट जगातील सर्वात मोठ्या लैंगिक गुन्हेगाराशी अप्रत्यक्षपणे जोडले गेलेले नाव, यामुळे अखेर स्टार्मर यांची खुर्ची गेली आहे.

पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी 5 जुलै 2024 रोजी ब्रिटनची सत्ता हाती घेतली होती. त्यांच्या पक्षाने 650 पैकी 411 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले होते. मात्र, त्यांचे विरोधक नेहमीच त्यांचा उल्लेख 'लंडनचे एलिट वकील' असा करायचे. वयाच्या 50 व्या वर्षी राजकारणात आलेल्या स्टार्मर यांच्याकडे राजकीय डावपेचांची कमतरता असल्याचे बोलले जाते. सुरुवातीला मोफत भेटवस्तू घेण्याचा वाद आणि नंतर कल्याणकारी योजनांमधील कपात यामुळे त्यांच्याच पक्षात प्रचंड नाराजी पसरली होती.

Advertisement

एपस्टीन कनेक्शन आणि ती एक मोठी चूक

कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्यामागचे सर्वात मोठे कारण पीटर मँडेलसन यांची अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून केलेली नियुक्ती ठरली. मँडेलसन यांचे जगातील सर्वात श्रीमंत लोकांसोबत चांगले संबंध होते, पण नंतर समोर आलेल्या धक्कादायक कागदपत्रांमुळे ब्रिटनच्या राजकारणात भूकंप झाला. 

( नक्की वाचा : UK Grooming Gangs: 'माझ्यावर 600 जणांनी बलात्कार केला'; संसदेत खासदाराने मांडला पीडितेचा भयानक अनुभव )

मैंडेलसन हे जगातील सर्वात मोठ्या लैंगिक गुन्हेगारांपैकी एक असलेल्या जेफ्री एपस्टीनचे सर्वात जवळचे मित्र असल्याचे उघड झाले 2008 साली एपस्टीन अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतरही मैंडेलसन त्याच्या संपर्कात होते.

त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये समोर आलेल्या ईमेल्सवरून स्पष्ट झाले की, मैंडेलसन यांनी सरकारी पदाचा गैरवापर करत अत्यंत संवेदनशील माहिती एपस्टीनला दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मैंडेलसन यांना अटक करून त्यांची चौकशीही केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सिक्युरिटी क्लिअरन्समध्ये नापास होऊनही स्टार्मर यांनी मैंडेलसन यांना इतक्या मोठ्या पदावर बसवले होते. यावरून लेबर पार्टीच्या खासदारांनी स्टार्मर यांच्या निर्णयक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यासाठी नंतर स्टार्मर यांना जाहीर माफी मागावी लागली.

 मे महिन्यात झाले निश्चित

या वर्षभरात स्टार्मर यांच्या अडचणी सातत्याने वाढत गेल्या. मे महिन्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लेबर पार्टीला संपूर्ण इंग्लंडमध्ये तब्बल 1,100 पेक्षा जास्त कौन्सिल जागा गमावाव्या लागल्या. या मोठ्या पराभवानंतर पक्षातील 80 पेक्षा जास्त खासदारांनी स्टार्मर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 14 मे रोजी आरोग्य मंत्री वेस स्ट्रीटिंग यांनी आणि त्यानंतर जूनमध्ये संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी स्टार्मर यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत आपल्या पदांचे राजीनामे दिले.

Advertisement

( नक्की वाचा : होर्मुझ बंद असतानाही अमेरिकेनं कसं काढलं 10 कोटी बॅरल तेल? NDTV ने शोधून काढले सॅटेलाइट पुरावे )
 

मंत्र्यांच्या राजीनाम्यांच्या सत्रादरम्यान लेबर पार्टीमध्ये अँडी बर्नहम नावाचे नेतृत्व वेगाने पुढे आले. मँचेस्टरच्या मेकरफील्ड जागेवर 19 जून रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत अँडी बर्नहम यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. बर्नहम यांचा हा विजयच कीर स्टार्मर यांच्या राजकीय कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला. 

या विजयानंतर स्टार्मर यांच्यावरील दबाव इतका वाढला की त्यांना अखेर पंतप्रधानपद सोडावे लागले. आता अँडी बर्नहम हेच ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. नव्या नेत्याची निवड होईपर्यंत स्टार्मर हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
 

Advertisement
Topics mentioned in this article