Microsoft Lay Off :आयटी क्षेत्रासाठी एक काळजीची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनी 9,100 कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करणार आहे. कंपनी एकूण कर्मचाऱ्यांमध्ये हे प्रमाण 4 टक्के आहे. 2023 नंतरची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असल्याचे वृत्त सिएटल टाईम्सने बुधवारी (2 जुलै 2025) दिले आहे.
जून 2024 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये जगभरात सुमारे 2,28,000 कर्मचारी होते. या वृत्तावर रॉयटर्सने प्रतिक्रिया विचारली असता, कंपनीने तात्काळ प्रतिसाद दिला नाही.
ब्लूमबर्ग न्यूजच्या जूनमधील अहवालानुसार, या टेक कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली होती, विशेषतः विक्री विभागात. मायक्रोसॉफ्टने मे महिन्यातही कर्मचारी कपातीची घोषणा केली होती, ज्यात सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांना कामातून कमी करण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरातच कंपनीनं ही दुसरी मोठी कपात केली आहे.
( नक्की वाचा: Infosys Engineer : इन्फोसिस इंजिनिअरनं शौचालयातील महिलेचा बनवला Video, भयंकर प्रकार पाहून सर्वच हादरले )
कोव्हिड-19 च्या महामारीतून जग सावरत असतानाच आर्थिक अनिश्चिततेचे ढग कॉर्पोरेट क्षेत्रावर घोंघावू लागले. अनेक कंपन्यांनी त्यांचे कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुरु केले आहेत. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी विविध क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात सुरू केली आहे, गेल्या वर्षीही अशाच प्रकारची कपात दिसून आली होती.