अमेरिकन निवडणुकीला बॉलिवूडचा तडका! कमला हॅरिससाठी एआर रहमानने काय केलं? वाचा

AAPI ने या परफॉर्मन्सचा टीझर देखील रिलीज केला, ज्यामध्ये एआर रहमान आणि इंडियासपोराचे संस्थापक एमआर रंगास्वामी परफॉर्मन्सची तयारी करताना दिसत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढील महिन्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात  लढत होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, भारतातील प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान कमला हॅरिसच्या समर्थनात दिसत आहेत. 

कमला हॅरिस यांना प्रोत्साहन देण्यासाठी एआर रहमानने  30 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. कमला हॅरिस यांना पाठिंबा देणारा एआर रहमान हे पहिला दक्षिण आशियातील कलाकार आहे. 

AAPI विक्ट्री फंडचे अध्यक्ष शेखर नरसिम्हन यांनी म्हटलं की,  ए.आर. रहमान यांनी अमेरिकेतील प्रगतीसाठी उभे राहिलेल्या नेत्यांच्या आणि कलाकारांच्या गटात आपला आवाज जोडला आहे. आम्हाला जे भविष्य पाहायचे आहे त्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि मतदान करावे.

AAPI विक्ट्री फंडने जाहीर केले की, जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि गायक रहमान यांनी हॅरिस यांच्या 2024 च्या अध्यक्षीय मोहिमेच्या समर्थनार्थ 30 मिनिटांचा विशेष व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ 13 ऑक्टोबर रोजी AAPI Victory Fund च्या YouTube वर प्रसारित केला जाईल. 

30 मिनिटांच्या या कार्यक्रमात कमला हॅरिसची ऐतिहासिक उमेदवारी आणि AAPI समुदायाप्रती बांधिलकी दर्शवणाऱ्या संदेशांसह एआर रहमानच्या काही सर्वोत्कृष्ट गाण्यांचा समावेश असेल, असे मीडिया ब्रीफमध्ये म्हटले आहे.

AAPI ने या परफॉर्मन्सचा टीझर देखील रिलीज केला, ज्यामध्ये एआर रहमान आणि इंडियासपोराचे संस्थापक एमआर रंगास्वामी परफॉर्मन्सची तयारी करताना दिसत आहेत. 

Topics mentioned in this article