Nepal Interim Govt: सस्पेन्स संपला! सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या हंगामी पंतप्रधान

व्हर्च्युअल बैठकीत सुमारे 5 हजारांहून अधिक तरुणांनी भाग घेतला. या व्हर्च्युअल बैठकीत सुशीला कार्की यांची हंगामी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 3 mins

नेपाळमध्ये हंगामी सरकारबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. सुशीला कार्की (Sushila Karki) नेपाळच्या हंगामी पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज रात्रीच शीतल निवास येथे होणार आहे. संसदेचे विसर्जन करण्यात आले आहे. नेपाळचे राष्ट्रपती, जनरेशन झेड ग्रुप आणि लष्करप्रमुखांमध्ये यावर व्यापक सहमती झाली आहे.पुढील निवडणूक 6 महिन्यांच्या आत होणार आहे. 5 मार्च 2026 रोजी संसद सदस्यांची पुढील निवडणूक होईल.

नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश सुशीला कार्की देशाच्या हंगामी सरकार प्रमुख बनल्या आहेत. राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ देण्यात आली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्यासह अनेक मोठे चेहरे उपस्थित होते. विशेष म्हणजे जेन-झेड (Gen-Z) आंदोलनानंतर बालेन शाह यांच्या नावाच्या चर्चेनेही हंगामी सरकार प्रमुख म्हणून जोर धरला होता. मात्र, त्यांनी स्वतः सुशीला कार्की यांना पाठिंबा दिला. सुशीला कार्की यांच्या शपथविधीमध्ये उपराष्ट्रपती रामसहाय यादव, सरन्यायाधीश प्रकाश सिंह रावत, माजी पंतप्रधान डॉ. बाबूराम भट्टराई, सरसेनापती जनरल अशोक राज सिग्देल, मुख्य सचिव एकनारायण अर्याल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नक्की वाचा - Nepal Crisis : नेपाळमध्ये 'राजा' पुन्हा येणार? राजेशाहीच्या मागणीला जोर; कोण आहे Gen Z युवराज हृदयेंद्र शाह?

सुशीला कार्की यांचे भारताशी खास नाते आहे. जेन-झेड (Gen-Z) आंदोलनानंतर सुशीला कार्की यांच्यासमोर नेपाळची सध्याची परिस्थिती हाताळण्याचे आव्हान असणार आहे. त्याआधी आपण जाणून घेऊया की सुशीला कार्की यांची हंगामी सरकार प्रमुख म्हणून निवड कशी झाली. सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1979 मध्ये वकिलीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या 11 जुलै 2016 ते 6 जून 2017 पर्यंत नेपाळच्या मुख्य न्यायाधीश होत्या.2017 मध्ये त्यांच्याविरोधात महाभियोग आणला गेला होता. त्यावेळी सुशीला कार्की यांच्यावर कार्यपालिकेत हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र, सुशीला कार्की यांची ओळख एक अशा न्यायाधीश म्हणून आहे, ज्यांना भ्रष्टाचार अजिबात सहन होत नाही. त्या 2006 मध्ये घटनात्मक मसुदा समितीच्या सदस्यही होत्या.

Advertisement

 Nepal Protest : फक्त एका ‘नाही' मुळे नेपाळ भारताबाहेर राहिले, अन्यथा आज...ऐतिहासिक सत्याची Inside Story 

जेन-झेडच्या बंडानंतर नेपाळमध्ये बदलाचे पर्व
नेपाळमध्ये जेन-झेडच्या बंडानंतर आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. नेपाळमधील पूर्वीची शासन व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. देशाची सध्याची व्यवस्था सांभाळण्यासाठी हंगामी कार्यकारी मंडळाची स्थापना करण्याची चर्चा आहे. हंगामी प्रमुख म्हणून नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव सर्वात पुढे होते. खरे तर नेपाळमधील सुरू असलेल्या निदर्शनांनंतर आणि केपी शर्मा ओलींच्या राजीनाम्यानंतर माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची नेपाळच्या हंगामी नेत्या म्हणून निवड करण्याची चर्चा सुरू झाली होती.बुधवारी निदर्शनांदरम्यान जेन-झेड आंदोलनकर्त्यांनी एक व्हर्च्युअल बैठक बोलावली होती. या व्हर्च्युअल बैठकीत सुमारे 5 हजारांहून अधिक तरुणांनी भाग घेतला. या व्हर्च्युअल बैठकीत सुशीला कार्की यांची हंगामी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.