एक गाय जी तब्बल 410000000 रुपयांना विकली गेली आहे. म्हणजेच जवळपास 4.82 मिलियन डॉलर मध्ये. ज्याची भारतीय रुपयांत किंमत होते 41 कोटी रुपये. तुम्ही म्हणाल ही गाय आहे की काय आहे? पण हे खरं आहे. ही गाय तब्बल 41 कोटी रुपयांत विकली गेली आहे. विशेष म्हणजे ही गाय भारतीय असून ती आंध्र प्रदेशातील आहे. या गायीची विक्री ब्राझिलमध्ये करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ही माहिती ट्वीट द्वारे दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ब्राझिलमध्ये आंध्र प्रदेशातील एक गाय तब्बल 4.82 मिलियन डॉलरमध्ये विकली गेली. म्हणजेच भारतीय रुपयांत विचार करायचा झाल्यास 41 कोटी रुपयांत ती विकली गेली आहे. ही गाय ओंगोल या जातीची आहे. या गायीचे नाव वियातिना-19 असे आहे. ही गाय आता जगातली सर्वात महाग गाय आहे. या गायीच्या विक्री मुळे तिने जपानच्या प्रसिद्ध वाग्यू जातीच्या गायीला मागे टाकले आहे.
ट्रेंडिंग बातमी - MMR मध्ये नवी 1 लाख घरं, अवघ्या 15 लाखात, कुठे कराल नोंदणी? कोण ठरणार पात्र?
ओंगोल गायचे मुळ हे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील आहे. या गायीने ओंगोल जातीची ताकद जागतीक व्यासपीठावर दाखवून दिली आहे असं ट्वीट आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केले आहे. शिवाय त्यांनी याबातमीची लिंकही शेअर केली आहे. आंध्र प्रदेशात समृद्ध असे पशुधन आहे. हे जगाला दाखवून दिले आहे. ही गाय अंगकाठीने मजबूत असते. शिवाय ती दुधासाठी ही प्रसिद्ध आहे. GoAP हे या जातीच्या गाईंच्या संरक्षणासाठी काम करते. शिवाय शेतकऱ्यांनाही हे मदत करतात.
गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये ही या गायीची आता नोंद झाली आहे. ही गाय दुधाच्या व्यवसायासाठी फायदेशीर समजली जाते. या गायीच्या शरीराची रचना, उष्णता सहन करण्याची ताकद आणि गायीच्या मासपेशींमुळे ती खास बनते. ओंगोल गायींचा नियमित लिलाव केला जातो. 2023 साली ब्राझिलमध्ये हीच गाय 4.3 मिलियन डॉलरमध्ये विकली गेली होती. या गायीची जात भारतात मात्र संघर्ष करताना दिसत आहे. तर दुसरीकडे याच गायीमुळे कोट्यवधी कमवले जात असल्याचे आता समोर आले आहे.