Asim Munir in US : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून उघडपणे "अणुयुद्धाचा" इशारा दिला आहे. टँपा, फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना, पाकिस्तानच्या वास्तविक लष्करी शासकाने धमकी दिली की, भविष्यात भारतासोबतच्या युद्धात त्यांच्या देशाला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला, तर ते "अर्ध्या जगाला" नष्ट करुन समाप्त होतील.
रिपोर्ट्सनुसार, "आम्ही एक अण्वस्त्र राष्ट्र आहोत. आम्हाला वाटले की आमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तर आम्ही अर्ध्या उद्धवस्त करु," असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या भूमीवरून तिसऱ्या देशाविरुद्ध दिलेली ही पहिलीच अण्वस्त्र धमकी असल्याचे मानले जाते. टँपासाठी मानद वाणिज्यदूत म्हणून काम करणारे व्यापारी अदनान असद यांनी मुनीर यांच्यासाठी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणादरम्यान मुनीरनं ही धमकी दिल्याचं वृत्त आहे
भारतावर हल्ला करण्याची धमकी
पाकिस्तानच्या फील्ड मार्शलने सिंधू नदीच्या जलमार्गांवर भारताने कोणतीही पायाभूत सुविधा (infrastructure) उभारल्यास ती नष्ट करण्याची धमकी दिली आहे, आपल्याकडे क्षेपणास्त्रांची (missiles) कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्लीने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 250 दशलक्ष लोकांना उपासमारीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा मुनीर यांनी केला.
( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
"आम्ही भारताने धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते करेल, तेव्हा 'फिर दस मिसाइल से फारिग कर देंगे' [आम्ही ते 10 क्षेपणास्त्रांनी नष्ट करू]... सिंधू नदी ही भारतीयांची कौटुंबिक मालमत्ता नाही. 'हमें मिसाइलों की कमी नहीं है, अल-हम्दुलिल्लाह' [आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, देवाचे आभार]," असे मुनीर यांनी कथितपणे सांगितले.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मागील दौऱ्यात, 18 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दुपारच्या जेवणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या भेटीदरम्यान, त्यांनी ट्रम्प यांच्या कथित शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्याची शिफारस केली होती. मुनीर यांनी फ्लोरिडामधील कार्यक्रमात पुन्हा एकदा हा प्रस्ताव मांडला.
( नक्की वाचा : India - Pakistan : अरबी समुद्रात तणाव, भारत-पाकिस्तानचे नौदल आमने-सामने! इशारा जारी... )
वृत्तानुसार, या कार्यक्रमात पाकिस्तानी वंशाचे अंदाजे 120 फ्लोरिडा-स्थित सदस्य उपस्थित होते, जिथे सहभागींना सेलफोन किंवा इतर डिजिटल उपकरणे घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. कार्यक्रमात इस्रायल संरक्षण दलाचा (Israel Defence Forces) एक प्रतिनिधी देखील उपस्थित असल्याचे वृत्त आहे.