पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर पाकिस्ताननं सिंधू पाणी वाटप करार स्थगित करणे ही युद्धासारखी कारवाई असल्याचं म्हंटलं आहे. त्याचबरोबर भारतासोबतचा सर्व व्यापार रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय. तसंच भारत आणि पाकिस्तानमध्ये 1972 साली झालेला शिमला करारही रद्द करण्यात आलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्ताननं कोणते निर्णय घेतले?
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व द्विपक्षीय करार स्थगित
- 1972 साली झाली शिमला करार स्थगित
- वाघा बॉर्डर बंद करण्याची घोषणा
- भारताला एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय
काय आहे शिमला करार?
- 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर हा करार झाला
- शिमला कराराच्या पार्श्वभूमीवरच बांगलादेशची निर्मिती झाली
- पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिरा गांधी यांच्यात हा करार
- शिमला करारानुसार सर्व वाद द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवण्यासाठी कटीबद्ध
- नियंत्रण रेषेचा दोन्ही देश सन्मान करतील, एकतर्फी बदल अमान्य
- दोन्ही देश युद्ध किंवा प्रपोगंडा करणार नाहीत, शांतता राखतील
- भारतानं जे 90 हजार पाकिस्तानी सैनिक पकडले त्यांना सोडलं जाईल
- भारत युद्धात कब्जा केलेली जमीन परत करणार
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं 5 कठोर निर्णय घेतले होते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सीसीएसच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आज (गुरुवार, 24 एप्रिल) बिहारमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा दिला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं हे निर्णय घेतले आहेत.
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार )
पाणी अडवणे हे युद्धासारखेच
भारतानं सिंधू पाणी वाटप स्थगित करणे ही युद्धजन्य कृती आहे, असं पाकिस्ताननं म्हंटलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादमध्ये बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तानच्या तीन्ही सैन्याचे प्रमुख, सर्व प्रमुख मंत्री तसंच सैन्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.