Pakistan Train Hijack:बलूच लिबरेशन आर्मीने प्रथमच जाफर एक्सप्रेस कशी Hijack केली याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानी सैन्याला कसे गुडघ्यावर आणले ते ही या व्हिडीओतून त्यांनी दाखवले आहे. बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यापूर्वीचा एक व्हिडिओ जगा समोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये, बीएलएचे सैनिक ट्रेनचे अपहरण करण्यापूर्वी तयारी करत असताना दिसत आहेत. या व्हिडीओतून जाफर एक्सप्रेस कशी Hijack करण्यात आली याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जाफर एक्सप्रेसवर बीएलए सैनिकांचा हल्ला आणि ट्रेनचे अपहरण करण्याची तयारी या व्हिडीओ दिसत आहे. शिवाय बलूच सैनिकांनी पाकिस्तानच्या सैन्याला कसे शरण येण्यास भाग पाडले हे देखील याच व्हिडीओत सांगितले आहे. बलूच सैनिकांनी मार्चमध्ये बोलन भागात जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे जवान प्रवास करत होते. बीएलएने जाफर एक्सप्रेसच्या अपहरणाच्या ऑपरेशनला 'ऑपरेशन दर्रा-ए-बोलन 2.0' असे नाव दिले होते.
बलूच लिबरेशन आर्मीच्या मीडिया विंगने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये जाफर एक्सप्रेसवरील हल्ला आणि त्यापूर्वी बीएलए सैनिकांनी अपहरण कसे करायचे याचे प्रशिक्षण घेतले असल्याचे दिसत आहे. यासोबतच, जमिनीवर ट्रेनच्या मार्गाचा नकाशा बनवून त्याचे अपहरण करण्याची संपूर्ण तयारी करताना ते दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यावर हे समजते की जाफर एक्सप्रेसचे अपहरण करण्यापूर्वी बीएलएच्या सैनिकांनी जोरदार तयारी केली होती. त्यासाठी लागणारं आवश्यक प्रशिक्षण ही त्यांनी घेतले होते.
बलूचिस्तान प्रांतात मार्च महिन्यात बलूच लिबरेशन आर्मी (BLA) च्या सैनिकांनी जफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती. बोलन जिल्ह्यातील एका दुर्गम डोंगराळ भागात सुमारे 500 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. सुमारे 36 तास चाललेल्या संघर्षानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ट्रेन आणि प्रवाशांना सोडवण्याचा दावा केला होता. पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की त्यांनी 33 हल्लेखोरांना ठार केले. तर 21 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाला होता. बीएलएचे म्हणणे आहे की यात 214 लोक मारले गेले. ज्यामध्ये बहुतेक पाकिस्तानी सैन्याशी संबंधित लोक होते असा दावा करण्यात आला होता.