Taliban vs Pakistan : दोस्त दोस्त ना रहा... तालिबान आणि पाकिस्तान एकमेकांचे वैरी का बनले? वाचा कारण

Taliban vs Pakistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ऐकेकाळच्या मित्र देशांमध्ये सध्या संघर्ष सुरु आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Taliban vs Pakistan : अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानचं मोठं योगदान आहे. विसाव्या शतकात सोव्हिएट रशियानं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. रशियाला अफगाणिस्तानमधून हुसकावून लावण्यासाठी पाकिस्ताननं तालिबान ही धर्मांध तरुणांची संघटना उभारली. तालिबाननं अफगाणिस्तान काबिज केला. महिलांवर कठोर निर्बंध लादले. संपूर्ण देश मध्ययुगात नेला. त्यानंतरही पाकिस्तानचा अफगाणिस्तानर आशिर्वाद कायम होता.

अमेरिकेनं 9/11 नंतर लष्करी कारवाई करत तालिबानला अफगाणिस्तानमधून हुसकावून लावलं. पण, अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य माघारी जाताच तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तान बळकावलं. तालिबानच्या या दुसऱ्या राजवटीमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाकिस्ताननं नुकताच अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये अनेक तालिबानी दहशतवादी मारले गेले. या प्रकारानं संतप्त झालेल्या अफगाणिस्ताननं पाकिस्तानला उत्तर दिलंय. आता पाकिस्तानचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये घुसल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही देशांमधील संघर्षावर वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आणखी गुंतागुतीचा बनलाय. 

काय घडलं?

24 डिसेंबर रोजी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर कथित एअर स्ट्राईकमध्ये 46 जण मारले गेले. त्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. तहरीक-ए-तालिहान-पाकिस्तान म्हणजेच TTP या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केल्याचा पाकिस्तानी सैन्यीाचा दावा आहे. पाकिस्तान सरकार उलथवून टाकणे आणि तिथं इस्लामी राजवटीची स्थापना करणे हा या संघटनेचा उद्देश आहे. ही संपूर्ण संघटना अफगाणिस्तानमधून काम करते. पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यात वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांना ही संघटना जबाबदार असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा बंडाचा वणवा, हसीनानंतर युनूस यांची सत्ताही जाणार? )
 

काय आहे कारण?

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणावाचं खरं कारण ऐतिहासिक आहे. इंग्रजांनी दोन्ही देशांची सीमा निश्चित करण्यासाठी बनलेली डूरंड लाईन  (Durand Line) तणावाचं मूळ आहे. अफगाणिस्तान सरकारनं ही सीमा कधीही मान्य केलेली नाहीय. त्यामुळे हा वाद आजही सुरु आहे. हा आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचं अफगाणिस्तानचा दावा आहे. 

तालिबानच्या राजवटीनं पाकिस्तान सरकारविरोधात काम करणाऱ्या संघटनांवर कारवाई करावी अशी पाकिस्तानची मागणी होती. पण, तालिबाननं कारवाई करण्यास नकार दिला. 

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधील अफगान राष्ट्रवाद कमकुवत करण्यासाठी कट्टर धार्मिक शक्तींना चालना दिली. पाकिस्तानमध्ये शरणार्थी म्हणून आलेल्या तरुणांना लष्करी प्रशिक्षण दिलं. त्यांना युद्धाची ट्रेनिंग दिलं. अफगाणिस्तानवर आपला प्रभाव वाढावा म्हणून पाकिस्ताननं हे सर्व प्रयत्न केले होते. पण, आता हे सर्व उपाय त्यांच्या अंगलट आले आहेत. कारण यामधील काही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्येच दहशतवादाचा फैलाव करत आहेत. 
 

Advertisement
Topics mentioned in this article