Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय?

Pakistan on Indus Water Treaty : ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याच्या नुकसानीबरोबरच देशात पाण्याचं संकट उभं राहण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यानंतर त्यांनी आता थेट भारताकडं विनंती केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Pakistan on Indus Water Treaty :  जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahlgam Terrorist attack) उत्तर देण्यासाठी भारतानं (Operation Sindoor) राबवलं. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्ताननं कितीही वल्गना केल्या तरी भारताबरोबरच्या संघर्षानंतर त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सैन्याच्या नुकसानीबरोबरच देशात पाण्याचं संकट उभं राहण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यानंतर त्यांनी आता थेट भारताकडं विनंती केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारनं मोठा निर्णय घेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या भारताच्या या निर्णयाला पाकिस्ताननं 'सिमला करार' रद्द करत उत्तर दिलं. जगातील अनेक देशांपुढे हात जोडल्यानंतरही पाकिस्तानचा प्रश्न सुटलेला नाही. आता भावी संकटाचा विचार करत पाकिस्ताननं भारताला विनंती केली आहे.

सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय योग्य नाही. या निर्णयामुळे आमच्या देशात मोठं संकट निर्माण होणार आहे, त्यामुळे भारतानं या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती करणारं पत्र पाकिस्तानच्या जलसंधारण मंत्रालयानं भारताला लिहिलं आहे. 

( नक्की वाचा : Operation Sindoor भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अणुगळती झाली? परराष्ट्र मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण )
 

भारताची भूमिका काय?

या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या विनंतीनंतरही दया करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. 'पाणी आणि रक्त' एकत्र वाहू शकत नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं होतं.

Advertisement

भारत तीन नद्यांच्या पाण्याचा वापर करण्याची योजना बनवत आहे. त्यावर काम तातडीनं सुरु झालं आहे. त्याचबरोबर मध्यकालीन आणि दीर्घकालीन योजनांना अंतिम रुप देण्याचं काम देखील सुरु आहे. 

भारताचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी या विषयावर बोलताना सांगितलं होतं की, 'पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबवेपर्यंत भारताकडून सिंधू जल करार स्थगित ठेवण्यात येईल. 'सिंधू जल करार चांगुलपणा आणि मैत्रीच्या भावनेतून करण्यात आला होता, जे कराराच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद आहे. त्यानंतरही, पाकिस्तानने दशकानुदशके सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देऊन या तत्त्वांना तिलांजली दिली आहे."

Advertisement

काय आहे सिंधू नदी वाटप पाणी करार?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 9 वर्षांच्या चर्चेनंतर 19  सप्टेंबर 1960 रोजी हा करार झाला होता. जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं झालेल्या या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती. 

या करारानुसार भारताला रावी, व्यास आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचं नियंत्रण मिळालं होतं. तर सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमकडेली नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानला मिळालं होतं. पाकिस्तानला या कराराचा मोठा फायदा होत होता. पण, भारतानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार रद्द करत त्यांची कोंडी केली आहे. 
 

Advertisement