Miss World स्पर्धेत पाकिस्तानची पहिल्यांदाच एन्ट्री, अनिका जमालने सोशल मीडियावर मार्केट केलंय जाम, पाहा Photos

पाकिस्तान असा देश आहे ज्याने 73 वर्षांच्या इतिहासात कधीही मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला नाही. पण मिस वर्ल्ड फेस्टिव्हलच्या 75 व्या अॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये हा देश इतिहास रचणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pakistani Model Anika Jamal Viral News

Anika Jamal Viral Photos : पाकिस्तान असा देश आहे ज्याने 73 वर्षांच्या इतिहासात कधीही मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला नाही. पण मिस वर्ल्ड फेस्टिव्हलच्या 75 व्या अॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये हा देश इतिहास रचणार आहे. 24 वर्षांची अनिका जमाल व्हिएतनाममध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणार आहे.पाकिस्तानच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होणार आहे.अनिकाला लाहोरमध्ये अधिकृतपणे 'मिस वर्ल्ड पाकिस्तान 2026'चा ताज परिधान करण्यात आला.पाकिस्तानच्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील भागिदारी कट्टर इस्लामिक गटांना नराज करू शकते.

मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंटमध्ये पाकिस्तानची एन्ट्री

अनिकाच्या रुपात पाकिस्तान पहिल्यांदाच मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंटमध्ये अधिकृतपणे भाग घेणार आहे.इस्लामिक देश पाकिस्तानसाठी हे एवढं सोपं नसणार आहे.इथे मुलींना मॉडलिंग करणं खूप कठीण आहे.अशाप्रकारच्या फॅशन शो दाक्षिणात्य भागातील लोक नेहमीच विरोध करतात.अनिका या स्पर्धेत भाग घेऊन इस्लामिकच्या कट्टर लोकांच्या निशाण्यावर येऊ शकते.

Advertisement

नक्की वाचा >> Exclusive: 'वैशूला आज संपवलं...'नाशिकच्या वैष्णवी आवारे हत्येची Inside Story! वेड्या प्रेमाचा रक्तरंजित अंत

अनिका जमाल करणार पाकिस्तानचं प्रतिनिधित्व

24 वर्षांच्या अनिकाने आधीही 'मिस अर्थ',मिस ग्लोबल, मिस कॉस्मो, मिस इको इंटरनॅशनल आणि मिस ऑरा इंटरनॅशनल मध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.ती सध्या अकाऊंटिंग आणि ऑडिटिंगमध्ये मास्टर्स करत आहे.ती कोसोवा मध्ये 'मिस फ्रीडम ऑफ द वर्ल्ड' स्पर्धेत चार किताब जिंकले आहेत.

अनिका जमालचं ध्येय काय आहे?

अनिकाने म्हटलंय की,ती या मिस वर्ल्ड प्लॅटफॉर्मचा उपयोग सामाजिक प्रश्नांसाठी करणार आहे.पाकिस्तानमध्ये थॅलेसीमियाने बाधित झालेल्या लोकांना मदत करणं हे तिचं ध्येय आहे.पाकिस्तानच्या महिलांना मागील दोन दशकांपासून वर्ष 2002 मध्ये स्थापन झालेल्या 'मिस पाकिस्तान वर्ल्ड ऑर्गनायझेशन' इंटरनॅशनल ब्यूटी पेजेंटसाठी तयार करत आहे.