VIDEO : ब्राझीलमध्ये विमान कोसळलं; 57 प्रवाशांसह 61 जणांचा मृ्त्यू

Brazil Plane Crashed : साओ पाउलो राज्यातील विन्हेडो येथे विमान कोसळले आणि निवासी भागात पडलं अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये एका घराचे देखील नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र घरातील कुणालाही इजा झालेली नाही. 

Advertisement
Read Time: 2 mins

ब्राझीलच्या साओ पाउलोजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी 61 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, त्यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या प्रादेशिक विमान कंपनी व्होएपासने एका निवेदनात ही माहिती दिली.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साओ पाउलो राज्यातील विन्हेडो येथे विमान कोसळले आणि निवासी भागात पडलं अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये एका घराचे देखील नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र घरातील कुणालाही इजा झालेली नाही. 

(नक्की वाचा-  Video - राज यांच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी 'सुपाऱ्या' फेकल्या, मनसैनिकांनी धडा शिकवण्याचा 'विडा' उचलला)

छोटे डबल इंजिन असलेल्या विमानाने दक्षिण ब्राझीलमधील पराना राज्यातील कॅस्केवेल शहरातून उड्डाण केले आणि ते साओ पाउलो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. मात्र आपल्या निश्चित स्थळी पोहोचण्याआधीच विमान कोसळलं आणि 61 जणांना आपला जीव गमवावा लागला. 

Advertisement

(नक्की वाचा-  जालना-जळगावसह देशातील 8 नवीन रेल्वे मार्गांना केंद्रीची मंजुरी, कसा होईल फायदा?)

कंपनीला कळवण्यास खेद वाटतो की फ्लाइट 2283 मधील सर्व 61 प्रवाशांचा घटनास्थळी मृत्यू झाला," एअरलाईन कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 57 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे एअरलाइन्सने म्हटले. अपघातग्रस्त विमानाची निर्माता कंपनी एटीआरने सांगितले की, त्यांचे तज्ज्ञ अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहेत.

Topics mentioned in this article