धक्कादायक : रोबोटला झाला कामाचा ताण असह्य, उचललं टोकाचं पाऊल

मनासारखं घडलं नाही, कामाचा ताण असह्य झाला किंवा अन्य एखाद्या कारणानं मनुष्यानं जीव देण्याच्या दुर्दैवी घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, जगात पहिल्यांदाच रोबोटनं तसं केलंय.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मनासारखं घडलं नाही, कामाचा ताण असह्य झाला किंवा अन्य एखाद्या कारणानं मनुष्यानं जीव देण्याच्या दुर्दैवी घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, जगात पहिल्यांदाच रोबोटनं आत्महत्या केली आहे. दक्षिण कोरियातल्या गुमी शहरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. कामाचा ताण असह्य झाल्यानं या रोबोटोनं पायऱ्यावरुन उडी मारुन जीव दिला. काही मिनिटांमध्येच रोबोटमधील मशिनचे तुकडे झाले. या प्रकारानं जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडालीय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डेली मिररच्या रिपोर्टनुसार गुमीमधील नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मदतनीस म्हणून हा रोबोट काम करत होता. त्यानं ऑक्टोबर 2023 मध्ये इथं कामाला सुरुवात केली होती. त्यानं इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान असलेल्या पायऱ्यावरुन उडी मारली. 

रोबोटोनं आत्महत्या केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्यावर कामाचा ताण होता. कोणताही ब्रेक किंवा सुट्टी न घेता काम केल्यानं त्यानं हे पाऊल उचललं अशी प्रतिक्रिया युझर्स देत आहेत. गुमी शहरातल्या नागरिकांनाही या घटनेचा धक्का बसलाय. पालिका प्रशासनानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रोबोट शेवटी ज्या भागात होता तेथील फुटेजचीही तपासणी करण्यात येतीय. 

( नक्की वाचा : भारतीय मानवी मोहिमेचा मुहुर्त ठरला, गगनयान आणि समुद्रयानाचे सदस्य निश्चित झाले )

नगर पालिका प्रशासनाकडून रोबोटचे सर्व तुकडे एकत्र केले जात आहेत. त्याच्या आधारानं तो बनवणारी कंपनी या घटनेचं विश्लेषण करेल. इतरांपेक्षा हा रोबोट वेगळा होता. लिफ्ट बोलवणे तसंच खाली ये-जा करणे ही काम तो स्वत: करत असे, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article