Vladimir Putin Visits North Korea : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगला भेट दिली. या ऐतिहासिक दौऱ्यात त्यांनी त्यांचे खास मित्र किम जोंग-उन यांना एक लग्झरी लिमोजिन कार भेट दिली आहे. ही कार एकदम खास आणि आधुनिक आहे. त्या बदल्यात किम जोंग उन यांनी पुतीनला उत्तर कोरियामधील एक खास भेट दिलीय. या दोघांच्या मैत्रीवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या गिफ्ट्सचीही सर्वत्र चर्चा होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी आहे कार ?
पुतीन यांनी भेट दिलेली कार अत्यंत आधुनिक आहे. यामध्ये 4.4 लीटरचं ट्विन टर्बो व्ही9 इंजिन लावण्यात आलंय. हे इंजिन 598 बीएचपीची पॉवर आणि 880 न्यूटन मीटरचे पिक टॉर्क जनरेट करते. ही कार बुलेट प्रुफ असून रासायनिक हल्ला तसंच क्षेपणास्त्राचा मारा देखील सहन करु शकते.
ट्रेंडींग बातमी - कोण आहेत जॉर्जिया मेलोनी? मेलोनींबाबतच्या 'या' आहेत 10 रंजक गोष्टी
या कारची माहिती फारशी उपलब्ध नाही. पण, यामध्ये एलईडी सिस्टम, वाय-फाय, वायरलेस चार्जर, आरामदायी सीट्स, मोठं स्क्रीन, इमरजेन्सी कॉल सपोर्ट आणि आधुनिक ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसह अनेक सेफ्टी फिचर्स पाहायला मिळतात.
किम-जोन उननं काय दिली भेट?
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोगं उन यांनी पुतीन यांना त्यांच्या देशातील 2 खास शिकारी कुत्रे भेट दिली आहेत. हे पुंगसन ब्रीडचे खास कुत्री आहेत. जी फक्त उत्तर कोरियामध्येच आढळतात. ही कुत्री अत्यंत साहसी आणि क्रूर मानली जातात. शिकारीसाठी या कुत्र्यांचा वापर उत्तर कोरियात केला जातो.