युक्रेनच्या सुरक्षा सेवा (एसबीयू) कडून रशियावर रविवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एसबीयूने रशियाच्या हवाई तळांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. कीव इंडिपेंडेंटने एका सूत्रानुसार लिहिले आहे की, या हल्ल्यात 40 हून अधिक रशियन बॉम्बर जेट्सचे नुकसान झाले आहे. यापूर्वी, वृत्तसंस्था एएफपीनुसार, रविवारीच रशियातील दोन पुलांना लक्ष्य करण्यात आले होते. ज्यात सात लोकांचा मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या एका मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर ओलेन्या हवाई तळावर अनेक रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग लागल्याची बातमी आहे. युक्रेनने रशियाच्या हवाई तळ 0106 ला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. इरकुत्स्क प्रदेशातील रशियन गव्हर्नरने घोषित केले आहे की, युक्रेनियन रिमोट-कंट्रोल्ड यूएव्हीने श्रीदनी गावात लष्करी युनिट्सवर हल्ला केला आहे. आणि सायबेरियामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध थांबण्याची लक्षणे दिसत नाही. दोन्ही देश मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे हे युद्ध आणखीन चिघळत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ हे युद्ध थांबेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. रशिया आणि युक्रेन दोन्ही देश मागे हटण्यासा तयार नाहीत. अशात आता युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे रशिया ही पलटवार करणार हे नक्की आहे. त्यामुळे रशिया आता काय करणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.