एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाला तर तो व्यक्ती उपचारासाठी डॉक्टरकडं जातो. डॉक्टरांच्या उपचारानंतर तो बरा होण्याची शक्यता असते. पण, संपूर्ण देशालाच मानसिक आजार झाला असेल तर... पाकिस्तान सध्या एका अशाच मानसिक आजारानं त्रस्त आहे. त्यावर उपचार करण्याच्या ऐवजी त्या आजाराचा उत्सव केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराचं कंबरडं मोडलं आहे. त्यांची बिकट अवस्था संपूर्ण जगानं पाहिलीय. त्यानंतरही पाकिस्तानी नागरिक काहीही करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी देखील त्यामध्ये सहभागी झाला आहे.
आफ्रिदी हा सतत खोटे बोलण्यासाठी आणि प्रोपगंडा (खोट्या बातम्यांचा प्रसार) करण्यासाठी ओळखला जातो. आफ्रिदीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांना किस करताना दिसत आहे.
( नक्की वाचा : Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )
आफ्रिदीची ही कृती पाहून तो भूतकाळातील गोष्टींपासून काही शिकला नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण, पाकिस्तानचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन इम्रान खान सध्या तुरुंगात सडतोय. त्याला जेलमध्ये घालण्यात पाकिस्तानच्या लष्कराचाच महत्क्वाचा हात आहे. क्रिकेटपटू आणि पाकिस्तानची आर्मी यांच्यात सलगी होऊ शकत नाही, हे वास्तव आफ्रिदी विसरला का? असा प्रश्न विचारला जात आहे.
आफ्रिदीला मिळाला पुरस्कार
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या इस्लामाबादमधील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात आफ्रिदी सहभागी झाला होता. या भेटीत शाहबाज शरीफ यांनी आफ्रिदीचे अभिनंदन केले. भारताच्या विरोधात विष ओकणाऱ्या या माजी क्रिकेटपटूला शरीफ यांनी पुरस्कार दिला आहे.
याच कार्यक्रमादरम्यान शाहिद आफ्रिदी आणि माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली. दोन्ही माजी खेळाडूंनी आसिम मुनीर यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर आफ्रिदीने मुनीर यांना किस केले. यापूर्वी शाहिद आफ्रिदी शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर कराचीच्या रस्त्यांवर मिरवणूक काढतानाही दिसला होता.
आफ्रिदीचे काश्मीरवर विषारी फुत्कार
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगानं निषेध केला. त्यावेळी आफ्रिदीनं भारतीयांना चिथवणारं वक्तव्य केलं होतं. 'भारत आपल्याच लोकांना मारतो,' असं आफ्रिदी त्यावेळी म्हणाला होता. काश्मीरवर विषारी फुत्कार करण्याचा आफ्रिदीचा इतिहास जुनाच आहे.
2020 मध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या (POK) च्या दौऱ्यादरम्यान आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारतात धार्मिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला होता. 2019 मध्ये जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाच्या एका दिवसानंतर शाहिद आफ्रिदीने संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या परिस्थितीची दखल घेण्याची मागणी केली होता. काश्मीरमध्ये मानवतेविरुद्ध होत असलेल्या अनावश्यक आक्रमकता आणि गुन्ह्यांवर लक्ष दिले पाहिजे, असं ट्विट त्यानं केली. शाहिद आफ्रिदीने नोव्हेंबर 2018 मध्येही काश्मीरच्या स्वातंत्र्याचं आवाहन केलं होतं.