Shocking News: स्वतःच्याच पत्नीला 120 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, सुन्न करणारी घटना

पीडितेवर दबाब टाकण्यात आला होता की तिला गुंगीचे औषध दिले जात होते, याबाबत सध्या गुप्तता पाळली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

काही लोक विकृतीचा कळस गाठत असतात. अशीच एक मानवतेला काळिमा फासणारी  धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचे लैंगिक शोषण केल्याचा आणि तिला किमान 120 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढली असून, आरोपी पती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना स्विडन या देशात घडल्याचे समोर आले आहे. 

सरकारी वकील इडा एनरस्टेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या पत्नीचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले आहे. ऑक्टोबरमध्ये पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपीने सर्व आरोप फेटाळले असले तरी, तपासाअंती संशयित पुरुषांची संख्या 120 वर पोहोचली आहे. या प्रकरणात महिलेला अमली पदार्थ देण्यात आले होते का, किंवा पैशांच्या मोबदल्यात हे कृत्य घडले का, याचा तपास अद्याप सुरू आहे.

Advertisement

नक्की वाचा - Trending News: नोकरदारांची दिवाळी! एप्रिलपासून खिशात येणार जास्तीची सॅलरी, असे आहे नवे गणित

स्वीडिश कायद्यानुसार, लैंगिक सेवांची विक्री करणे हा गुन्हा नाही, परंतु अशा सेवा विकत घेणे किंवा त्यासाठी कोणाला भाग पाडणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणात दोषी आढळल्यास आरोपी पतीला 2 ते 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच लैंगिक सेवा विकत घेतल्याच्या संशयावरून इतर दोन पुरुषांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसांकडे तक्रार केली आणि या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला. 

नक्की वाचा - IAS Officer: आधीच्या दोन्ही पत्नी IAS आणि आता तिसरीही...; 'या' बड्या सनदी अधिकाऱ्याच्या लग्नाची तुफान चर्चा

पीडितेवर दबाब टाकण्यात आला होता की तिला गुंगीचे औषध दिले जात होते, याबाबत सध्या गुप्तता पाळली जात आहे. हे कृत्य केवळ विकृत छंदापोटी केले की पैशांसाठी, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीने आतापर्यंत सर्व गुन्हे नाकारले आहेत, मात्र पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास चक्र गतीने फिरवत आहेत. या प्रकरणात केवळ पतीच नाही, तर संबंध ठेवणाऱ्या 120 पुरुषांवरही अटकेची टांगती तलवार आहे. स्वीडनच्या कडक कायद्यानुसार या सर्वांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.