Shocking news: अस्वलाचं रूप घेऊन लावला 1 कोटींचा चुना, घोटाळ्याची पद्धत पाहून तुम्ही म्हणाल बाप रे बाप...

'ऑपरेशन बेअर क्लॉ' नावाने प्रसिद्ध झालेल्या या तपासात अस्वलाचा पोषाख आणि गुन्ह्यात वापरलेले चाकू हस्तगत करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कॅलिफोर्नियामधील लेक एरोहेड भागात ऑपरेशन बेअर क्लॉ अंतर्गत मोठा घोटाळा उघड करण्यात आला
  • आरोपींनी रोल्स रॉयस आणि मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्यांवर अस्वलाच्या हल्ल्याचा बनाव केला
  • त्यानंतर विमा कंपनीकडून मोठा क्लेम करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा डाव फसला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Operation Bear Claw: पैसे कमवण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. झटपट पैसे कमवण्याच्या नादात वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात. मग हे करत असताना काय चूक काय बरोबर हे पाहीले जात नाही. त्यासाठी ज्या काही युक्त्या केल्या जातात त्या पाहून सर्वच जण हैराण होतात. असच एक प्रकरण समोर आले आहे. कॅलिफोर्नियामधील लेक एरोहेड भागात एका धक्कादायक आणि तितक्याच विचित्र फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. 'ऑपरेशन बेअर क्लॉ' अंतर्गत पोलिसांनी अशा चार मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत, ज्यांनी कोट्यवधींच्या विम्यासाठी चक्क अस्वलाचे रूप धारण केले होते. या अजब चोरीची चर्चा आता जगभरात रंगली आहे.

या प्रकरणातील आरोपींनी आपल्या रोल्स रॉयस घोस्ट आणि मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्यांचे नुकसान करण्यासाठी एक फिल्मी प्लॅन आखला. अस्वलाने गाडीवर हल्ला केल्याचा बनाव रचण्यासाठी एका आरोपीने अस्वलाचा पोषाख (कॉस्च्युम) घातला. त्यानंतर मांस कापण्याच्या सुऱ्याने गाड्यांच्या महागड्या सीट फाडून टाकल्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करून विमा कंपनीकडे 1.2 कोटी रुपयांचा म्हणजेच  $1,42,000 क्लेम करण्यात आला होता. पण सीसीटीव्ही फुटेजमधील अस्वलाची चाल पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर सगळा खेळ खलास झाला. 

Advertisement

नक्की वाचा - TCS Nashik Case: फिगर, हनिमूनबाबत अश्लील कमेंट्स ते विनयभंग, विवाहितेने कंपनीत काय-काय घडलं? सगळं सांगितलं

सुरुवातीला विमा कंपनीला हा प्राण्यांचा हल्ला वाटला, पण व्हिडिओची बारकाईने तपासणी केल्यावर अस्वलाची हालचाल संशयास्पद वाटली. अस्वल ज्या पद्धत चालत होतं, त्यावरून काही लोकांच्या मनात शंका आली. मग तज्ज्ञांच्या मदतीने फॉरेन्सिक तपास केला असता, तो प्राणी नसून माणूस असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी आरोपींच्या घरावर छापा टाकला असता, तिथे अस्वलाचा तो पोषाख आणि चाकू जप्त करण्यात आला. त्यामुळे आरोपींचा पैसे उकळण्याचा डाव उधळला गेला. आणि हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला.   

नक्की वाचा - Iran War Newsअयातुल्ला अली खामेनेईंचा मृत्यू होऊन 50 दिवस उलटले,दफनविधी का नाही? तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

एप्रिल 2026 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला असून, कोर्टाने अल्फिया, रूबेन आणि वाहे या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना 180 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय दोन वर्षे ते पोलिसांच्या निगराणीखाली राहतील. याशिवाय, त्यांना $50,000 पेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. चौथ्या आरोपीवर अजूनही खटला सुरू आहे. मानवी हावरेपणा कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. आपल्याच महागड्या गाड्यांची अस्वलाच्या वेषात तोडफोड करून विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार तरुणांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. 'ऑपरेशन बेअर क्लॉ' नावाने प्रसिद्ध झालेल्या या तपासात अस्वलाचा पोषाख आणि गुन्ह्यात वापरलेले चाकू हस्तगत करण्यात आले आहेत.