दक्षिण कोरियाच्या माजी संरक्षणमंत्र्यांचा अंडरवेअरच्या मदतीनं जीव देण्याचा प्रयत्न

दक्षिण कोरियाचे माजी संरक्षणमंत्री किम योंग ह्यून (Kim Yong-hyun) यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

दक्षिण कोरियाचे माजी संरक्षणमंत्री किम योंग ह्यून (Kim Yong-hyun) यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दक्षिण कोरियात काही दिवसांपूर्वी 'मार्शल लॉ' लागू करण्यात आला होता. किम यांना या 'मार्शल लॉ'चे मास्टरमाईंड मानले जाते. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. किम यांनी अंडरवेरच्या मदतीनं जीव देण्याचा प्रयत्म केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोरिया करेक्शनल सर्विसचे संचालक जनरल शिन योन यांनी दिलेल्या माहितीनुसार किम यांनी सेऊलमधील डिटेंशन सेंटरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना हा प्रयत्न करत असताना पाहिले, त्यानंतर त्यांना तातडीनं रोखण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. विरोधी पक्षानं किम यांच्या महाभियोग चालवण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचवेळी किम यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किम यांनी शौचालयात कपड्यांची दोरी तयार करुन जीव देण्याचा प्रयत्न केला. माजी संरक्षण मंत्र्यांनी आत्महत्येसाठी अंडरवेयरचा वापर केला. त्यांना आता देखरेखीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. 

( नक्की वाचा : राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत? )

किम यांना बंडखोरी आणि सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलं आहे. दक्षिण कोरियामध्ये 3 डिसेंबर रोजी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेे ते पहिले व्यक्ती आहेत. त्यांच्यावर मार्शल लॉच्या दरम्यान सुरक्षा दलाला नॅशनल अ‍ॅसेब्लीमध्ये तैनात केल्याचा आरोप आहे. दक्षिण कोरियाच्या पार्लमेंटला हत्यारबंद सैनिकांनी वेढलं होतं. माजी संरक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसारच ही कृती करण्यात आली होती, अशी माहिती सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

सुरक्षा दलानं संसदेला घेराव घातल्यानंतरही खासदार सभागृहात प्रवेश करण्यात यशस्वी ठरले. त्यांनी एकमतानं मार्शल लॉ रद्द केला. त्यानंतर कॅबिनेटला 4 डिसेंबर रोजी मार्शल लॉचा निर्णय मागे घ्यावा लागला. या प्रकरणात आता कारवाई तसंच अटकसत्र सुरु झालं आहे. 

Topics mentioned in this article