Sudan Plan Crash: लष्कराच्या विमानाचा भीषण अपघात! 20 हून अधिक जणांचा मृत्यू; कुठे घडली भयंकर दुर्घटना?

विमान अपघाताची भयंकर घटना समोर आली असून सूडानमध्ये सैन्याचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे, ज्यामध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात विमान अपघातात मोठी वाढ झाली आहे. जगभरात घडलेल्या विमान अपघातांमध्ये शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना मागील काही महिन्यांमध्ये घडल्या होत्या. अशातच आणखी एक विमान अपघाताची भयंकर घटना समोर आली असून सूडानमध्ये सैन्याचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे, ज्यामध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुदानचे लष्करी विमान ओमदुरमन शहरात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 20  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लष्कर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) या घटनेची माहिती दिली. एपी वृत्तानुसार, लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या अपघातात अनेक लष्करी कर्मचारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामागील मुख्य कारणाबद्दल कोणतीही माहिती नाही. सुदानीज आर्मीच्या अहवालानुसार, मंगळवारी (24 फेब्रुवारी) वाडी सय्यदना एअरबेसवरून उड्डाण घेत असताना लष्कराचे अँटोनोव्ह विमान कोसळले.  सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ओमदुरमनमधील नाऊ रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. यासोबतच पाच नागरिकही जखमी झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत.

( नक्की वाचा : CBSE Exam : दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, वाचा काय आहे प्रस्ताव? )

2023 पासून सुदान यादवी युद्धाच्या विळख्यात आहे. येथे लष्कर आणि कुख्यात निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यातील तणावाचे रूपांतर युद्धात झाले. या संघर्षामुळे शहरी भाग, विशेषतः दारफूर प्रदेश उद्ध्वस्त होत आहे आणि वांशिक हिंसाचार आणि सामूहिक बलात्कारासारख्या भयानक घटनांना जन्म मिळत आहे. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय हक्क संघटनांनी या घटनांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्हे म्हटले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article