भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील त्याच्या दहशतवादाच्या अड्ड्यांना नष्ट केले. आता ही गोष्ट स्वतः पाकिस्तानने पाळलेले दहशतवादी मान्य करत आहेत. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील अनेक दहशतवादी तळ नष्ट केले. याच्या महिन्यांनंतर जैश-ए-मोहम्मदच्या एका कमांडरने कबूल केले आहे की, बहावलपूरमध्ये झालेल्या भारताच्या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा झाला. त्यांच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जैश कमांडर मसूद इलियास कश्मीरीला हे सांगताना ऐकले जाऊ शकते. तो या व्हिडीओत भारतीय सशस्त्र दलांनी त्याच्या तळावर घुसून कसा हल्ला केला हे सांगत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिक मारले गेले. त्यानंतर काही आठवड्यांनी, भारतीय सशस्त्र दलांने 'ऑपरेशन सिंदूर' चालवले. यात जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. पाकिस्तान आणि PoK मधील नऊ दहशतवादी तळांवर एकाच वेळी हल्ले केले गेले. पाकिस्तानने नंतर मान्य केले की, हल्ल्यांमध्ये नऊ ठिकाणांचे मोठे नुकसान झाले. ज्यात बहावलपूर, कोटली आणि मुरीदके येथील ठिकाणे समाविष्ट होती. या ठिकाणी कट्टर दहशतवादी कारवायांचे सर्व केंद्र होती.
पाकिस्तानचे 12 वे सर्वात मोठे शहर बहावलपूरलाही लक्ष्य केले गेले. कारण ते जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र तिथे आहे. लाहोरपासून 400 किमी दूर असलेल्या, जामिया मस्जिद सुभान अल्लाहमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या कायवायांचे मुख्यालय (operational headquarter) आहे. ज्याला उस्मान-ओ-अली कॅम्पस म्हणूनही ओळखले जाते.जैश-ए-मोहम्मद 2000 च्या सुरुवातीस स्थापन झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रतिबंधित केलेला दहशतवादी मसूद अजहरने तेव्हा काश्मीरमध्ये जिहादचा नारा दिला होता.
जैश-ए-मोहम्मद गेल्या दोन दशकांत भारतीय भूमीवरील अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानी माध्यमांनी सांगितले की, मसूद अजहरने एक निवेदन जारी करून कबूल केले की त्याचे कुटुंबातील 10 सदस्य भारतीय ऑपरेशनमध्ये मारले गेले होते. अजहर स्वतः अनेक वर्षांपासून लपून बसलेला आहे. पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो जरदारी यांनी दावा केला आहे की इस्लामाबादच्या सरकारला त्याचे ठिकाण माहीत नाही. जूनमध्ये एका मुलाखतीत, भुट्टो जरदारी म्हणाले होते की, जर भारताने ही माहिती दिली की तो पाकिस्तानी भूमीवर आहे, तर पाकिस्तानला त्याला अटक करेल.