एका पंधरा वर्षाच्या हिंदू मुलीनं हिंदू धर्माचा त्याग केला आहे. ऐवढचं नाही तर तिने इस्लाम धर्म ही स्विकारला आहे. ती ऐवढ्यावरच थांबली नाही तर तिने एका 7 मुलींचा बाप असलेल्या मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न ही केलं आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मजात बोलू आणि ऐकू न शकणारी, 15 वर्षांची एक हिंदू मुलगी गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होती. आता ती अल्पवयीन मुलगी माध्यमांसमोर आली आहे. त्यानंतर या धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला आहे.
यामुलीने माध्यमांसमोर आल्यानंतर आपण इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय तिने आपल्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या एका मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याचा गंभीर आरोप केला आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंध जिल्ह्यातील बादिन जिल्ह्यातील कोरवा शहरातून ही मुलगी नऊ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी स्थानिक पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पण तिचा पत्ताच लागला नाही. ती पोलीसांनाही सापडली नाही.
नक्की वाचा - Bank Holidays: सोमवारी बँका सुरू राहणार की बंद? जाणून घ्या कोणत्या दिवशी आहेत सुट्ट्या
मात्र, शनिवारी ही मुलगी तिच्या पतीसोबत बादिन प्रेस क्लबमध्ये माध्यमांसमोर हजर झाली. यावेळी तिने धर्म परिवर्तन केल्याचे प्रमाणपत्र सर्वांना दाखवले. याचे फोटो काढण्यात आले. आता मुलीच्या वडिलांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जी मुलगी बोलू किंवा ऐकू शकत नाही, ती अल्पवयीन मुलगी एका अशा व्यक्तीशी लग्न करण्यास कशी तयार झाली. जो ड्रग डीलर आहे. त्याला आधीच सात मुली आहेत? असा आरोपही मुलीच्या वडीलांनी केला आहे. त्यामुळे या पुढे करायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
"पीटीआयच्या अहवालानुसार, हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या दारावर इत्तेहाद पाकिस्तान या संघटनेचे प्रमुख शिव काछी यांनी सांगितले की, "मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. कुटुंबाने तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. काछी पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या वकिलांशी बोललो आहोत, जेणेकरून या प्रकरणात पुढील कार्यवाही करता येईल. कारण, या मुलीने स्वतःच्या इच्छेने हे केले असेल, यावर आमचा विश्वास नाही." तसेच, त्यांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्रही लिहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.