Trending News: 33 वर्षांनंतर भाऊ-बहिणीची गळाभेट! चित्रपटाला लाजवेल अशी सत्यकथा, कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी

एक दिवस पावसापासून वाचण्यासाठी हे दोघे एका ट्रकमध्ये लपले, पण तो ट्रक त्यांना एका अनोळखी शहरात घेऊन गेला.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • चीनमधील एका बहिणीने 33 वर्षांपूर्वी अपहृत झालेला लहान भाऊ जुन्या छायाचित्राच्या आधारे शोधून काढला
  • ली लिनने भावाच्या शोधासाठी हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते वीटभट्ट्यांवर मजुरी करण्यापर्यंत सर्व कष्ट केले
  • बहिणीने भावाच्या शोधात सुमारे 10 लाख युआन खर्च केले आणि चिकाटीने शोध मोहीम राबवली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

नशिबाने ताटातूट झाली तरी रक्ताचे नाते विरत नाही. याचा प्रत्यय चीनमधील एका घटनेतून आला आहे. तब्बल 33 वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या आपल्या भावाला एका बहिणीने केवळ एका जुन्या बालपणीच्या छायाचित्राच्या आधारे शोधून काढले आहे. ही कथा सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. नात्यातील वीण घट्ट असेल तर काळ आणि अंतर त्याला कधीही मिटवू शकत नाही, याचाच प्रत्यय आणणारी ही हृदयस्पर्शी घटना आहे. चीनमधील एका बहिणीने चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तब्बल 33 वर्षांनंतर आपल्या हरवलेल्या भावाला शोधून काढले आहे. या शोधमोहिमेत तिची एकमेव ताकद होती ती म्हणजे भावाचा लहानपणीचा एक जुना फोटो.

ली लिन आणि तिचा लहान भाऊ ली शिन बालपणीच पोरके झाले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकत असताना, पावसापासून वाचण्यासाठी ते एका ट्रकमध्ये शिरले. मात्र, याच प्रवासात एका अनोळखी महिलेने लहान भावाला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेले. तेव्हापासून ली लिनने आपल्या भावाचा शोध सुरू केला. तिने हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते वीटभट्ट्यांवर मजुरी करण्यापर्यंत सर्व कामे केली आणि भावाच्या शोधासाठी जवळपास 1 दशलक्ष युआन खर्च केले.

Advertisement

नक्की वाचा - Trending News: प्लास्टिक बाटली द्या आणि बक्षीस मिळवा! कचरा दिल्यावर मिळतोय रिवॉर्ड, काय आहे ही अनोखी मोहीम?

दुसरीकडे, तिच्या भावाला एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. जिथे त्याने अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत केले. जियांग्शी प्रांतातील एका पोलीस अधिकाऱ्याने जुन्या फोटोंच्या साहाय्याने तपास चक्रे फिरवली. अखेर डीएनए चाचणीनंतर या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. 33 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या बहीण-भावाची भेट झाली असून, हा क्षण पाहून उपस्थित पोलीस अधिकारीही गहिवरले. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील आहे. ली लिन (वय 44 वर्षे) आणि तिचा लहान भाऊ ली शिन हे लहानपणीच अनाथ झाले होते. कर्करोगाने आईचा मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांचे मानसिक संतुलन बिघडले.

नक्की वाचा - Ashok Kharat: खरातला कोण-कोण फोन करत होते? एक नाव तर धक्कादायक, दमानियांकडून कॉल डिटेल्स जाहीर

एक दिवस पावसापासून वाचण्यासाठी हे दोघे एका ट्रकमध्ये लपले, पण तो ट्रक त्यांना एका अनोळखी शहरात घेऊन गेला. तिथे एका महिलेने भावाला खाऊ दिला आणि तिला सोबत घेऊन गेली. लिनला वाटले ती मदत करत आहे, पण तो तिचा अपहरणाचा डाव होता. त्यानंतर भावाच्या शोधासाठी बहिणीने स्वतःचे आयुष्य पणाला लावले. तिने हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते वीटा वाहण्यापर्यंत सर्व कष्ट केले. त्यातून जमवलेले सुमारे 10 लाख युआन (सुमारे 1.2 कोटी रुपये) भावाच्या शोधात खर्च केले. शेवटी जियांग्शी प्रांतातील एका पोलीस अधिकाऱ्याने त्या जुन्या फोटोच्या आधारे एका संशयित व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर डीएनए चाचणी करण्यात आली आणि दोन्ही भाऊ-बहीण 33 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले.