Trump Putin salary: रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचा पगार किती? डोनाल्ड ट्रम्प पेक्षा जास्त की कमी?

यातील सर्वात कॉमन असलेला प्रश्न हा होता की या दोघांचा पगार किती? शिवाय दोघांमध्ये सर्वात जास्त पगार कोणाला मिळतो? आपण हेच आज जाणून घेणार आहोत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे दोन्ही नेते जगातील ताकदवाद नेते म्हणून ओळखले जातात. नुकतीच या दोन्ही नेत्यांची अलास्का इथं भेट झाली. युक्रेन युद्धा बाबत या दोघांनी इथं चर्चा केली. त्यावेळी जगातील अनेकांना या भेटी दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित झाले. यातील सर्वात कॉमन असलेला प्रश्न हा होता की या दोघांचा पगार किती?  शिवाय दोघांमध्ये सर्वात जास्त पगार कोणाला मिळतो? आपण हेच आज जाणून घेणार आहोत. 

व्लादिमीर पुतिन यांचा पगार

अधिकृत कागदपत्रांनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वार्षिक वेतन सुमारे 1,40,000 अमेरिकन डॉलर्स  म्हणजेच  1.16 कोटी रुपये इतके आहे. हे वेतन क्रेमलिनने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीवर आधारित आहे. मात्र, अनेक अहवाल आणि विश्लेषकांचा असा विश्वास आहे की त्यांची खरी संपत्ती आणि उत्पन्न जाहीर केलेल्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. तब्बल  एक कोटी सोळा लाख भारतीय रुपये हे पुतिन यांनाल पगार म्हणून वर्षाला मिळतात. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा पगार

तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत वार्षिक वेतन 4,00,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3.32 कोटी रुपये आहे. हे वेतन अमेरिकन कायद्यानुसार ठरवण्यात आले आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष म्हणून, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पगार दान करण्याची घोषणा केली होती. त्यांनी ते वेतन घेतले नाही.

पुतिन यांचा पगार ट्रम्प यांच्यापेक्षा कमी की जास्त?

  • अधिकृत पगाराची तुलना केल्यास, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा पगार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पगारापेक्षा खूप कमी आहे.
  • पुतिन यांचे अधिकृत वेतन: दरवर्षी $1,40,000
  • ट्रम्प यांचे अधिकृत वेतन: दरवर्षी $4,00,000