ना ट्रम्प,ना शाहबाज ना जिनपिंग! युद्धबंदीसाठी 'या' नेत्याने पडद्यामागे फिरवली सुत्र, ठरला खरा 'पीसमेकर'

हे युद्ध ना ट्रम्प,ना शाहबाज ना जिनपिंग यांनी थांबलं. या मागे होते ते एका नेत्याचे अदृष्य हात.

जाहिरात
Read Time: 2 mins

US-Iran Ceasefire: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना, एका व्यक्तीच्या शांत पण प्रभावी मुत्सद्देगिरीने विनाश टाळला आहे. हे युद्ध ना ट्रम्प,ना शाहबाज ना जिनपिंग यांनी थांबलं. या मागे होते ते एका नेत्याचे अदृष्य हात. त्याने पडद्यामागे राहून शांत पणे सर्व सुत्र हलवली. त्यांच्या या मुत्सद्देगिरीला यश ही आलं आणि युद्धविराम झाला. ते नाव म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स (JD Vance). राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर इराणला संपवण्याच्या धमक्या देत असताना, वेन्स यांनी पडद्यामागून हालचाली करत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या माध्यमातून इराणला युद्धविरामासाठी (Ceasefire) तयार केले.

गेल्या काही दिवसांत ट्रम्प यांनी इराणचा उल्लेख 'सनकी' असा केला होता. इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची चेतावणी दिली होती. ट्रम्प यांचा हा 'गरम' स्वभाव आणि जेडी वेन्स यांचा 'नरम' म्हणजेच मुत्सद्दी दृष्टिकोन या जोडीने इराणला चर्चेच्या टेबलवर आणले. रॉयटर्सच्या अहवालानुसार, वेन्स यांनी पाकिस्तानचे पीएम शाहबाज शरीफ यांच्याशी थेट संपर्क साधला, जेणेकरून इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्यापर्यंत शांततेचा संदेश पोहोचवता येईल.

Advertisement

नक्की वाचा - US-Iran War: 15 दिवसांसाठी थांबलं युद्ध...आता इराणनं 40 दिवसांपासून लपवलेलं सर्वात मोठं रहस्य संपणार!

इराणने अमेरिकेच्या इतर दूत किंवा ट्रम्प यांच्या जावयापेक्षा (जारेड कुशनर) जेडी वेन्स यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. याचे मुख्य कारण म्हणजे वेन्स यांचा युद्धाला असलेला जुना विरोध. माजी मरीन राहिलेले वेन्स इराक युद्धाचा अनुभव असल्याने मध्य आशियातील लष्करी संघर्षाच्या विरोधात आहेत. इराणला याची खात्री होती की, वेन्स हेच एकमेव व्यक्ती आहेत जे ट्रम्प यांच्या आक्रमकतेला संतुलित करू शकतात आणि ज्यांचे म्हणणे ट्रम्प गांभीर्याने ऐकतात.

नक्की वाचा - US Iran War Latest News: इराण आणि अमेरिका सीझफायर: युद्ध थांबलं पण भारतासाठी शिकण्यासारखे 4 मोठे धडे

जेव्हा इराणने अमेरिकेच्या इतर मध्यस्थांशी बोलण्यास नकार दिला, तेव्हा वेन्स यांनी पाकिस्तानचा मार्ग निवडला. वेन्स यांनी इराणला स्पष्ट ताकीद दिली होती की, जर ते चर्चेला आले नाहीत तर ट्रम्प इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करतील. या दबावामुळे आणि वेन्स यांच्या मुत्सद्देगिरीमुळे अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाला आहे. ट्रम्प यांनीही आता अधिकृतपणे मान्य केले आहे की, वेन्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हेच या शांतता चर्चेचे नेतृत्व करत आहेत.