US-Iran Ceasefire: हजारो नागरिक रस्त्यावर, अल्लाहू अकबरचे नारे, युद्धविरामानंतर इराणमध्ये काय घडलं?

अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात इराणी जनतेचा आक्रोश संपूर्ण जगाने पाहिला.

जाहिरात
Read Time: 2 mins

इराणमध्ये सलग 40 दिवसांपासून सुरू असलेला हाहा:कार अखेर थांबला आहे. या विध्वंसात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. शेकडो चिमुकल्यांनी जीव गमावला. पण इराणी सरकार अमेरिकेसमोर झुकलं नाही. इराण अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलं. त्यामुळे तूर्तास अमेरिकेला या युद्धात माघार घ्यावी लागली आहे. याचाच जल्लोष साजरा करण्यासाठी इराणी नागरिक रस्त्यावर उतरले होते. गेल्या 40 दिवसांपासून इराणच्या जनतेनं जे सहन केलं,त्याच फलित म्हणून या युद्धविरामाकडे पाहिलं जात आहे.  

मध्यरात्रीनंतर इराणचे नागरिक रस्त्यावर उतरले. हातात इराणचे झेंडे आणि अल्लाहू अकबरचे नारे देत त्यांनी एकच जल्लोष केला. अवघ्या तीन दिवसात युद्ध संपेल असा दावा ट्रम्प यांनी केला होता. पण इराणने अमेरिकेला तब्बल पाच आठवडे झुंजवत ठेवलं. एवढच नाही तर पुढची दहा वर्ष हे युद्ध चालू ठेवण्याची आमची ताकद असल्याचं इराणच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलं. इराण माघार घेत नाही म्हटल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं नामोनिशाण मिटवण्याचा इशारा दिला. 

Advertisement

नक्की वाचा - ना ट्रम्प,ना शाहबाज ना जिनपिंग! युद्धबंदीसाठी 'या' नेत्याने पडद्यामागे फिरवली सुत्र, ठरला खरा 'पीसमेकर'

इराणला दोन आठवड्यांचा अल्टिमेटम देत होर्मूझची खाडी खुली करायला सांगितलं होतं. पण अल्टिमेटम संपायच्या काही तास आधीच त्यांनी स्वत: दोन आठवड्यांच्या य़ुद्धविरामाची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांची ही बिकट अवस्था पाहता, इराणसाठी ही फार सकारात्मक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे अमेरिका - इराण युद्ध सुरू होण्यापूर्वीची स्थिती, आणि आताची स्थिती पूर्ण उलट दिसत आहे. युद्ध सुरू होण्याआधी इराणची जनता रस्त्यावर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती.

नक्की वाचा - US-Iran War: 15 दिवसांसाठी थांबलं युद्ध...आता इराणनं 40 दिवसांपासून लपवलेलं सर्वात मोठं रहस्य संपणार!

पण ही आंदोलन अयातुल्लाह अली खामेनी यांच्याविरोधात होती. इराणमध्ये अली खामनेईचं सरकार उलथवण्यासाठी ही आंदोलन होती. मात्र अली खामनेईंच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिस्थितीच बदलली.  खामनेईंच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात इराणी जनतेचा आक्रोश संपूर्ण जगाने पाहिला. अयातुल्लाह अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता आणि बरोबर 40 दिवसांनी युद्धविरामाची घोषणा झाली आहे. त्यामुळे या युद्धविरामाची वेळ इराणी जनतेसाठी फार खास ठरली आहे. तूर्तास युद्धविरामाच्या घोषणेमुळे इराणमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र हा आनंद पुढेही कायम राहील का ? डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अटी मान्य करून युद्धबंदी करणार का ? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.