US Iran War: 'युद्ध तुम्ही सुरू केलं शेवट आम्ही करणार' इराणने अमेरिकेला अशी धमकी का दिली?

जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी 20 टक्के व्यापार याच होर्मुज मार्गावरून होतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिका आणि इराणमधील वाद आता टोकाच्या वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चक्क 'मिटवून टाकण्याची' धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर लारीजानी यांनी हे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हे युद्ध आणि चिघळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या धमकीनंतर आता अमेरिका त्याला काय प्रतिसाद देते हे ही पहावे लागणार आहे.  

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत इराणला इशारा दिला होता की, जर इराणने 'होर्मुज सामुद्रधुनी'तून (Strait of Hormuz) तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका 20 पट अधिक घातक हल्ला करेल. "इराणवर मृत्यू आणि विनाशाचा वर्षाव होईल," असे ट्रम्प म्हणाले होते. याला उत्तर देताना लारीजानी यांनी म्हटले की, "इराणी जनता पोकळ धमक्यांना घाबरत नाही. तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांनीही प्रयत्न केले, पण ते इराणला संपवू शकले नाहीत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, नाहीतर स्वतःच संपून जाल.

Advertisement

नक्की वाचा - Khamenei's Five Mistakes : अली खामेनींचं नेमकं काय चुकलं? धक्कादायक 5 चूका ठरल्या जीवघेण्या

जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी 20 टक्के व्यापार याच होर्मुज मार्गावरून होतो. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत अमेरिका आणि इस्रायलच्या मित्रराष्ट्रांना या भागातून एक लीटर तेलही नेऊ दिले जाणार नाही. युद्धाचा शेवट आता अमेरिका नाही तर इराण ठरवेल, असा आक्रमक पवित्रा इराणने घेतला आहे.

नक्की वाचा - Iran US-Israel War: इराणवर नवं संकट! तेहरानमध्ये काळ्या पावसाने नागरिकांचं आरोग्य धोक्यात

अली लारीजानी यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत म्हटले आहे की, इराण कोणत्याही दबावाखाली येणार नाही. ट्रम्प यांनी इराणची ताकद संपल्याचा दावा केला होता, मात्र इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने हा दावा फेटाळून लावला आहे. "आम्ही अमेरिका-इस्रायलच्या सहयोगी देशांना या मार्गावरून तेल नेऊ देणार नाही," असा पवित्रा इराणने घेतल्याने कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.