अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये गुरुवारी एक विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सॅन डिएगोमध्ये धुक्यामुळे एक छोटे विमान कोसळले. यामुळे जवळपास 15 घरांना आग लागली. त्यानंतर एकच धावपळ उडाली. याबाबत माहिती मिळताच बचाव कार्यही तातडीने सुरू करण्यात आलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमान कोसळल्यानंतर अपघातस्थळ रिकामे करण्यात आले. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचा आकडा अजून ही जाहीर करण्यात आलेला नाही. पण या अपघाताशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. त्यात अनेक घरांना आग लागलेली दिसत आहे. त्यामुळे हा अपघात किती मोठा असू शकतो याची कल्पना येते.
एपीच्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर सर्वत्र जेट इंधन (जेट फ्यूल) पसरले होते. त्यामुळे, आमचे पहिले उद्दिष्ट तेथे असलेल्या सर्व घरांची तपासणी करून तेथील लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हे होते. या अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, एपीने सांगितले की, अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये खळबळ उडाली आहे.
बुधवारी भारतातही श्रीनगर इथे एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले होते. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे इंडिगोच्या एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले. इंडिगोच्या फ्लाइट 6E2142 ला खराब हवामानामुळे आणीबाणी लँडिंग करावे लागले होते. त्यावेळी विमानात 227 प्रवासी होते. खराब हवामान आणि गारपिटी दरम्यान पायलटनी कंट्रोल रूमला आपत्कालीन स्थितीची माहिती दिली. यात विमानाच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले होते. त्याचे फोटो ही समोर आले होते.