अमेरिकेत हरियाणातल्या जिंदचा रहिवाशी असलेल्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 2022 मध्ये तो 'डंकी रूट'ने अमेरिकेत गेला होता. त्यासाठी त्याने 45 लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर त्याने अवैध मार्गाने अमेरिका गाठली होती. मृत कपिल अमेरिकेतील एका स्टोअरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. कपिलच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कुटुंबाने मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
कपिलचे वडील ईश्वर यांनी सांगितले की, कुटुंबाने खूप कष्ट करून 45 लाख रुपये जमा केले होते. त्यानंतर कपिलला 'डंकी रूट'ने अमेरिकेत पाठवले होते. कपिलच्या मृत्यूनंतर आता कुटुंबात दोन मुली आणि आई-वडील आहेत. कपिलचा जन्म 22 मे 2000 रोजी झाला होता. आता कुटुंबासमोर आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह भारतात आणण्याचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कुटुंबाने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. जेणेकरून ते आपल्या मुलाचा शेवटचा चेहरा पाहू शकतील, त्याच्यावर अंत्यसंस्कार करू शकतील.
हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती?
कपिल अमेरिकेतील एका स्टोअरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 5 सप्टेंबर रोजी कपिल स्टोअरमध्ये ड्युटीवर होता. त्याच वेळी एक अमेरिकन नागरिक तिथे लघुशंका करत होता. कपिलने त्याला असे करण्यापासून थांबवले. पण त्या अमेरिकन व्यक्तीने कपिलवर गोळी झाडली. गोळी लागल्याने कपिल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी 26 वर्षांच्या कपिलला जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. कपिलच्या चुलत भावाने दीपकने सांगितले की, कपिल दोन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.