लेबनान (Lebanon) बुधवारी (17 सप्टेंबर) रोजी झालेल्या पेजर स्फोटामधून सावरण्यापूर्वी 'वॉकी टॉकी' नं हादरलं आहे. या स्फोटात आत्तार्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 300 जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार हिजबुल्लाहचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागात वॉकी टॉकीचा स्फोट झाला आहे.
लेबनानमध्ये मंगळवारी संपर्कासाठी वापरण्यात येणाऱ्या हजारो पेजरमध्ये एकाचवेळी स्फोट झाले. या घटनेत 3000 हजारांपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 200 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. हिजुबुल्लाहच्या अनेक सदस्यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हिजुबुल्लाहनं या इस्रायल या स्फोटाला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
कसे झाले स्फोट?
लेबनानमधील पेजर स्फोटाचे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार पेजर सिस्टम हॅक करुन हे स्फोट घडवण्यात आले. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद या स्फोटाची सूत्रधार असल्याची शंका व्यक्त करण्यात आहे. त्यानंतर समोर आलेल्या आणखी एका थिअरीनुसार पेजरमधील लिथियम बॅटरी गरम करण्यात आली आणि त्याचा स्फोट झाला.
या प्रकरणात सांगण्यात येत असलेल्या माहितीनुसार स्फोट झालेले सर्व पेजर तैवानच्या गोल्ड ओपोलो कंपनीचे असून त्यांचा मॉडेल नंबर AP924 आहे. हे पेजर युरोपीयन देशात बनवण्यात आल्याचा दावा अपोलो कंपनीनं केला आहे. त्यांच्याकडं गोल्ड ओपोलो कंपनीचा नाव वापरण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.