Giorgio Armani : फॅशन आयकॉन जॉर्जियो अरमानी यांचे निधन, 12.1 अब्ज डॉलरच्या साम्राज्याचा वारसदार कोण?

Who Inherits Giorgio Armani's Fashion Empire? : अरमानी यांना कोणतेही वारसदार नसल्याने त्यांच्या प्रचंड संपत्तीची आणि कंपनीची जबाबदारी कोण सांभाळणार, याबाबत चर्चा सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Giorgio Armani : प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
मुंबई:

Who Inherits Giorgio Armani's Fashion Empire? :  प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातील फॅशन जगतात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अरमानी यांनी शून्यातून सुरुवात करून 12.1 अब्ज डॉलरचे (सुमारे 10 लाख कोटी रुपये) साम्राज्य उभे केले. त्यांनी केवळ फॅशनच नव्हे, तर हॉटेल्स, परफ्यूम्स आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांमध्येही आपला व्यवसाय वाढवला. अरमानी यांना कोणतेही वारसदार नसल्याने त्यांच्या प्रचंड संपत्तीची आणि कंपनीची जबाबदारी कोण सांभाळणार, याबाबत चर्चा सुरू आहे.


मेडिकलची पदवी सोडून सैन्यात काम, नंतर बनले फॅशन किंग

जॉर्जियो अरमानी यांनी त्यांचे कॉलेज शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यांनी मेडिकलचा अभ्यास सोडून काही काळ सैन्यात काम केले. मात्र, त्यांच्यातील फॅशनची आवड आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना. सुरुवातीला त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि फॅशनच्या जगात स्वतःचे स्थान निर्माण केले.

हॉलीवूडमधून मिळाली ओळख

अरमानी ब्रँडला खरी ओळख 1980 साली मिळाली, जेव्हा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियरने त्यांच्या डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला. या ड्रेसची त्यावेळी खूप चर्चा झाली आणि त्यानंतर अनेक अभिनेत्यांमध्ये त्यांच्या डिझाइन्सची मागणी वाढली. यामुळे अरमानी ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचला.

( नक्की वाचा : Kim Jong Un : पुतिन-किम यांच्या भेटीनंतर डीएनएचे ट्रेस मिटवण्याचे 'थ्रिलर' ; नेमकं काय घडलं?, पाहा Video )
 

फॅशनपासून हॉटेल्सपर्यंत साम्राज्य

जॉर्जियो अरमानी यांनी केवळ फॅशनपुरता त्यांचा व्यवसाय मर्यादित ठेवला नाही. त्यांनी आपले टॅलेंट वापरून लक्झरी हॉटेल्स, परफ्यूम्स, संगीत, स्पोर्ट्सवेअर आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांत आपला व्यवसाय विस्तारला. एवढेच नाही, तर त्यांच्या कंपनीने इटालियन बास्केटबॉल क्लब 'ओलम्पिया मिलानो'ची टीमही विकत घेतली.

Advertisement

मुल नाही, मग वारसदार कोण?

जॉर्जियो अरमानी यांना मुल नाही. ते त्यांची भाची रोबर्टावर खूप प्रेम करत होते. पण रोबर्टाने तिच्या फिल्मी करिअरसाठी अरमानी ग्रुपमध्ये पब्लिक रिलेशन डायरेक्टरची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. आता त्यांच्या निधनानंतर वारसदाराबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

रिपोर्ट्सनुसार, अरमानी यांनी त्यांच्या वारसदाराबद्दल आधीच विचार केला होता. त्यांच्या कंपनीतील विश्वासू सहकारी डेल'ऑरको किंवा कुटुंबातील सदस्य सिल्वाना अरमानी यांना अरमानीच्या व्यवसायाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या वारसदाराबद्दल अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.

Advertisement
Topics mentioned in this article